गोव्यातून कोकणात जाणाऱ्या अप-डाऊनच्या 8 रेल्वेगाड्या रद्द; प्रवाशांचा हिरमोड

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

गोव्यातून दरदिवशी आठ रेल्वे व लांब पल्ल्याची एक रेल्वे मिळून नऊ रेल्वेगाड्या कोकण मार्गावरून धावतात. तूर्त  अप-डाऊनच्या 8 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अमर्याद काळासाठी रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला.   

पणजी: देशातील सर्वसामान्य माणूस हा सर्वाधिक रेल्वेनेच प्रवास करतो. बस व विमान सेवेच्या तुलनेत रेल्वे प्रवास हा परवडणारा असतो. देशात कोरोना महामारीने थैमान घातल्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य झाली आहे. त्याचा रेल्वेच्या उत्पन्नावर झाला आहे. गोव्यातून दरदिवशी आठ रेल्वे व लांब पल्ल्याची एक रेल्वे मिळून नऊ रेल्वेगाड्या कोकण मार्गावरून धावतात. प्रवाशांसाठी कोरोना चाचणी सक्तीची केल्यापासून रेल्वेगाड्या सध्या जवळजवळ रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे तूर्त  अप-डाऊनच्या 8 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या अमर्याद काळासाठी रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला.   

गोव्यातील कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोव्यातून कोकणामध्ये धावणाऱ्या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची उपस्थिती खूपच कमी आहे. महाराष्ट्राने लॉकडाऊन करण्याबरोबर कोरोना चाचणी अहवालाचे प्रमाणपत्र (RTPCR) सक्तीचे केल्याने अनेकांनी गोव्यात जाण्यासाठी केलेले आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्थानक किंवा आरक्षात कार्यालयात रेल्वेगाड्यांच्या तिकीट सहज मिळत आहे. प्रवाशांची आवश्‍यक संख्याच नसल्याने 4 एक्स्प्रेस रेल्वेच्या अप - डाऊन फेऱ्या काही दिवस रद्द ठेवण्याचा निर्णय झाला असून त्यातील काहींची अंमलबजावणी आजपासून झाली आहे, असे घाटगे म्हणाले. 

Goa Lockdown: मंत्र्यांच्या दबावापुढे मुख्यमंत्री नमले 

गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून राज्यांनी कोरोनासंदर्भातचे निर्बंध शिथिल केल्यानंतर तसेच गोव्याने पर्यटकांना प्रवेश खुला ठेवल्याने मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांनी गोव्यात धाव घेतली होती. त्यावेळी कोकणातून धावणाऱ्या सर्व रेल्वेचे आरक्षण ‘फूल’ होत होते व प्रवाशीही प्रवास करत होते. रेल्वेंचा सर्वसाधारण बोगी या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काढून फक्त आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात होता व सुरक्षित अंतरामुळे रेल्वेच्या क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी घेतले जात होते. तेव्हा कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केला नव्हता. रेल्वेच्या उत्पन्नावर पूर्वी बोजा होता. मात्र, त्यात कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केल्याने प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करणे टाळले आहे. येता- जाताना ही चाचणी केल्यास त्यावरील खर्च हा प्रवाशाच्या कितीतरी पटीने असल्याने प्रवाशांनी प्रवास रद्द केला आहे.

गोवा: मजुरांची गोव्यातच राहण्यास पसंती - देश प्रभुदेसाई 

गोव्यातून कोकणमार्गे धावणाऱ्या अप-डाऊन 4 रेल्वेगाड्या रद्द करण्यापूर्वी गोव्यातून दहा रेल्वेगाड्या धावत होत्या. त्यामध्ये मंगला, मत्स्यगंधा, तेजस, जनशताब्दी, कोकण कन्या, मांडवी, मंगलोर, नेत्रावती एक्स्प्रेस या आठ गाड्या नियमित सुरू होत्या. राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा तर तेजस ही आठवड्यातून चारवेळा धावत होती. प्रत्येक रेल्वेला सरासरी 20 बोगी असतात त्याची क्षमता सरासरी एक हजार प्रवाशांची असते. सध्या ही उपस्थिती 10 टक्के सुद्धा नसल्याने प्रत्येक फेरीचा खर्चही भरून येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे सेवा ही अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्याने इतर पाच रेल्वे सुरू राहणार आहेत त्यामध्ये मंगला, जनशताब्दी, कोकण कन्या, मांडवी, नेत्रावती एक्स्प्रेस रेल्वेंचा समावेश आहे. लांब पल्ल्याच्या 4 रेल्वे गाड्या तूर्त रद्द करण्याचा निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली मात्र ज्यांना तातडीने जायचे असल्यास त्यांना जाता येणार नाही. त्यामुळे या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. 

गोवा: लाॅकडाऊनमधून उद्योगांना वगळण्याच्या निर्णयाचे जीएसआयएकडून स्वागत 

संबंधित बातम्या