मासळीवाहू आठ वाहनांच्या मडगावात काचा फोडल्या

मासळीवाहू आठ वाहनांच्या  मडगावात काचा फोडल्या

सासष्टी

मडगाव घाऊक मासळी मार्केटजवळ उभ्या करून ठेवलेल्या आठ मासळीवाहू वाहनांच्या काचा फोडल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घाऊक मासळी मार्केट बंद असून बुधवारी मार्केट बाहेर थांबून स्वस्त दरात मासळी विक्री केल्यामुळे वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असाव्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर जी मडगाव पालिकेची जागा आहे, त्या ठिकाणी बुधवारी स्वस्त दरात गोमंतकीयांना मासळी विक्री करण्यात आली होती, पण काल रात्री अज्ञात व्यक्तींनी मार्केटबाहेर उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या असून बुधवारी ज्या पालिकेच्या जागेत मासळी विक्री करण्यात येत होती, त्या ठिकाणी आज पोलिस तैनात करण्यात आले. वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती घाऊक मासळी मार्केटचे अध्यक्ष इब्राहिम मुसा यांनी दिली.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ३ मे रोजीपासून मासळी विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गोव्यातील अन्य मार्केटप्रमाणे घाऊक मासळी मार्केट सुरू करण्यासंबंधी एसजीपीडीएने बैठक घेऊक मार्केट खुले करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अद्याप हे मार्केट खुले करण्यात आलेले नाही. मार्केट खुले करण्यासाठी एसजीपीडीएच्या अध्यक्षाकडे मागणी करण्यात आलेली आहे, असे इब्राहिम मुसा यांनी सांगितले. घाऊक मासळी विक्री करण्यासाठी विक्रेत्यांकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे बुधवारी पालिकेच्या जागेत मासळी विक्री करण्यात आली होती. परंतु आज या ठिकाणी पोलिसांनी मासळी विक्री करण्यास दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.
फातोर्डा पोलिसांना संपर्क साधला असता, वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द भा.दं.सं.च्या ४२७ कलमाखाली तक्रार नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

भाज्या, फळ व अन्य जीवनवश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तरदूत करण्यात आली असून नागरिकांना स्वस्तात मासळीचाही पुरवठा होण्यासाठी घाऊक मासळी मार्केट सुरू करणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मासळी महाग झाली असून अशा स्थितीत मार्केट खुले करणे आवश्यक आहे. गोव्यात मासळी महाग झाली आहे यास एसजीपीडीए कारणीभूत आहे.
- इब्राहीम मुसा (घाऊक मासळी मार्केटचे अध्यक्ष)

goa goa goa goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com