'गोव्यातील या रूग्णालयांमध्ये मिळणार कोरोनाची लस'

IANS
सोमवार, 11 जानेवारी 2021

गोव्याच्या ३ खासगी व  ५शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री​ डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

पणजी :  भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला प्रारंभ होणार आहे. ही जगातील सर्वात  मोठी लसीकरणाच्या मोहीम ठरणार आहे.  गोव्याच्या ३ खासगी व ५ शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या बैठकीनंतर या मोहिमेची रूपरेषा ठरवून याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व राज्यांच्या  मुख्यमंत्र्यांसह होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर गोव्यातील लसीकरण कार्यक्रमासंदर्भात संबंधित विभागांची बैठक आयोजित केली जाईल." लसीकरणाच्या पहिल्या फेरीत अंदाजे १९,००० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. गोवा सरकारने लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यासाठी ८ रूग्णालयांमध्ये तयारी सुरू केली आहे. यामध्ये पाच सरकारी तर तीन खासगी रूग्णालयांचा समावेश असेल. सरकारी रूग्णालयांमध्ये यामध्ये गोवा वैद्यकिय महाविद्यालय, उत्तर व दक्षिण गोव्यतील दोन्ही जिल्हा रुग्णालयांचा समावेश असेल, तर तीन खाजगी - मणिपाल हॉस्पिटल, व्हिक्टर अपोलो हॉस्पिटल आणि हेल्थवे हॉस्पिटल या रूग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिम पार पडणार आहे. 

संबंधित बातम्या