G-20 Summit Goa: ‘जी-20’ च्या राज्यात होणार आठ बैठका- मुख्यमंत्री

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्यांसाठी मुदतवाढ; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय
G-20
G-20Dainik Gomantak

CM Pramod Sawant on G-20 Summit Goa: आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी-20 शिखर परिषदेच्या आठ बैठका गोव्यात होणार आहेत. 17 ते 19 एप्रिल अशी तीन दिवसांची पहिली बैठक ‘ताज’ आणि ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्यांसाठी मुदतवाढ देण्‍यात आल्‍याचेही यावेळी सांगण्‍यात आले.

जी-20 शिखर परिषदेमधील पहिली बैठक ही आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पणजीत सध्या जी-20 संदर्भातील कामे सुरू आहेत, ती पूर्ण केली जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माविन गुदिन्होही उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 वर्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन दिवसीय ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत सर्व बाराही मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तालुक्याच्या ठिकाणी, उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील. सकाळी 10 ते 1 या वेळेत हे मंत्री संबंधित तालुका कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत.

याशिवाय या दरम्यानच नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र, नोडल अधिकारी असणारे आयएएस अधिकारी सकाळी 10 ते 1 या वेळेत सर्व 191 ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना भेट देणार आहेत.

G-20
Smart City Project: त्या’ कंत्राटदारावर कारवाई करा!- बाबूश मोन्सेरात

आणखी हजार युवकांना टॅक्‍सी : गुदिन्‍हो

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षभरात आणखी १ हजार बेरोजगार युवकांना टॅक्‍सी व्‍यवसायात आणणार, असे गुदिन्हो म्हणाले.

गॅझेटियर आणि ऐतिहासिक नोंद नवा विभाग-

गोवा गॅझेटियर हे अभिलेखागार विभाग अंतर्गत एक विभाग होता. आता ते पूर्ण विभागामध्ये बदलले जाईल व त्याला गोवा गॅझेटियर आणि ऐतिहासिक नोंद असे नाव दिले जाईल. या विभागामार्फत विभागीय संशोधन होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

G-20
Goa Budget 2023-24: भरतीप्रक्रियेत बदल करा, अन्यथा महामंडळे बंद करणार- मुख्यमंत्री

योजनेला वर्षाची मुदतवाढ : गोवा मुक्ती लढ्यात विशेष काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांकरिता नोकऱ्यांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली. आता केवळ 90 पात्र लाभार्थी शिल्लक असल्याने ही शेवटची मुदतवाढ असेल. आपण पदभार घेतल्यानंतर या योजनेंतर्गत 270 नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. तर यापूर्वीच 200 ते 250 जणांना लाभ मिळाल्याचे मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्री व भेट देण्‍यात येणारे ठिकाण

मुख्यमंत्री सावंत - केपे

विश्‍वजीत राणे - सांगे

माविन गुदिन्हो - सत्तरी

रवी नाईक - तिसवाडी

नीलेश काब्राल - काणकोण

सुभाष शिरोडकर - पेडणे

रोहन खंवटे - सासष्टी

गोविंद गावडे - मुरगाव

बाबूश मोन्सेरात -फोंडा

सुदिन ढवळीकर -बार्देश

नीळकंठ हळर्णकर - धारबांदोडा

सुभाष फळदेसाई - डिचोली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com