डिचोली‍त दोन दिवसांत आठ पॉझिटिव्ह रुग्ण!

प्रतिनिधी
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

चतुर्थीच्या धामधुमीत कोरोना महामारीचा संसर्ग बळावण्याची भीती व्यक्‍त होत असतानाच मागील दोन दिवसांपासून डिचोली तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घटला आहे.  दरम्यान, रुग्णांचा आकडा घटत असतानाच कोरोनामुळे साखळी मतदारसंघातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली:  चतुर्थीच्या धामधुमीत कोरोना महामारीचा संसर्ग बळावण्याची भीती व्यक्‍त होत असतानाच मागील दोन दिवसांपासून डिचोली तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घटला आहे.  दरम्यान, रुग्णांचा आकडा घटत असतानाच कोरोनामुळे साखळी मतदारसंघातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काल रात्री उशिरा बांबोळी येथील गोमेकॉत संबंधित ६६ वर्षीय व्यक्‍तीचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. काल ३ आणि आज ५ मिळून तालुक्‍यात केवळ आठ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. मये विभागात दोन दिवसात एकही रुग्ण आढळून आला नाही, तर डिचोली विभागात केवळ आज एक तर साखळी विभागात काल ३ आणि आज ४ मिळून सात रुग्ण आढळून आले आहेत. रविवारपर्यंत तालुक्‍यात कोरोनाचे २६६ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. मये मतदारसंघातील ८८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ५४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत.  

एका रुग्णावर कोविड रुग्णालयात उपचार चालू असून एकाला घरी पाठवण्यात आले आहे. साखळी मतदारसंघातील ११० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ५७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. दोघांना घरी पाठवण्यात आले आहे. डिचोली मतदारसंघातील ६८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३८ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये, तर ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

संबंधित बातम्या