सरकारी कर्मचाऱ्यांकडून 'एक कदम स्वच्छता की और' अभियानचा संकल्प

'स्वच्छ भारत' अंतर्गत गांधीजयंतीदिनी शनिवारी आयोजित 'एक कदम स्वच्छता की और' अभियानाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सरकारी कर्मचाऱ्यांकडून 'एक कदम स्वच्छता की और' अभियानचा संकल्प
'स्वच्छ भारत' अंतर्गत गांधीजयंतीदिनी शनिवारी आयोजित 'एक कदम स्वच्छता की और' अभियानाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Dainik Gomantak

Bicholim: 'स्वच्छ भारत' अंतर्गत गांधीजयंतीदिनी (Gandhi Jayanti) शनिवारी आयोजित 'एक कदम स्वच्छता की और' अभियानाला (Campaign) सरकारी कर्मचाऱ्यांकडून (Government employees) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांनी साफसफाई करुन स्वच्छतेचा संदेश दिला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार तालुका प्रशासनातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'स्वच्छ भारत' अंतर्गत गांधीजयंतीदिनी शनिवारी आयोजित 'एक कदम स्वच्छता की और' अभियानाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नोकऱ्यांसाठी कुणीही पैसे घेत नाही घेतल्यास तक्रार करावी; CM सावंत

स्वच्छतेचा संदेश

'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत शहरात जागृतीही करण्यात आली. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी बावटा दाखविल्यानंतर जागृती रॅलीला सुरवात झाली. बाजारातून मुख्य रस्त्याने वाठादेव येथील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ या अभियानची सांगता झाली. या रॅलीवेळी सहभागी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गट विकास आदी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर आदी अधिकारी या अभियानात सहभागी झाले होते. या अभियानात महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. अभियानात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. मामलेदार प्रवीणजय अभियान आणि स्वच्छतेचे महत्व विषद करताना महिनाभर चालणाऱ्या या अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.