डिचोली: शिरगाव पंचायतींच्या सरपंचपदाची माळ अच्युत गावकराच्या गळ्यात

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

डिचोली तालुक्यातील शिरगाव पंचायतींच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे अच्युत गावकर यांच्या गळ्यात पडली आहे.

डिचोली: डिचोली तालुक्यातील शिरगाव पंचायतींच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे अच्युत गावकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्त सरपंच पदासाठी आज (बुधवारी) झालेल्या निवडणुकीत श्री. गावकर यांची बिनविरोध निवड झाली. रिक्त सरपंच  पदासाठी निवडणूक घेण्यासाठी बुधवारी  पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.

गोवा: राज्यात 8 एप्रिल नंतर तुरळक पावसाची शक्यता 

या बैठकीस मावळते सरपंच भगवंत  गावकर, उपसरपंच विजया मांद्रेकर आणि कल्पिता घाडी हे पंच उपस्थित होते. तर उपसरपंच विजया मांद्रेकर आणि  सदानंद गावकर  अनुपस्थित होते.

संबंधित बातम्या