पेडणे शेतकरी सेवा सोसायटी मंडळाची आज निवडणूक

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची २०२० ते २०२५ काळासाठी रविवारी ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सहा मतदान केंद्रातून ही निवडणूक होणार आहे.

 पेडणे: पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची २०२० ते २०२५ काळासाठी रविवारी ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सहा मतदान केंद्रातून ही निवडणूक होणार आहे.

ही निवडणूक दोन भागातून होणार असून, सहकार मित्र गटातर्फे उमेश शंकर गाड, संतोष मळिक, गोपाळ परब, श्रीपाद परब, शांबा सावंत, राजाराम गवस, सुहास नाईक, रामदास परब, अमित सावंत हे उमेदवार आहेत. तर याच गटाचे भाग दोन मधून ज्ञानेश्वर परब, विठोबा बगळी व गजानन शेट कोरगावकर हे तीन उमेदवार आहेत.

तर भाग एक मधून हनुमंत गवंडी, धाकटू नाईक हे स्वतंत्र उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर भाग दोनमधून महादेव गवंडी व उदय मांद्रेकर हे उमेदवार आहेत.
मतदानासाठी सहा केंद्रे पुढीलप्रमाणे ः १) पेडणे केंद्र हे पेडणे तालुका शेतकरी मुख्य कार्यालय - या केंद्रात पेडणे, धारगळ, विर्नोडा, वारखंड व नागझर गावातील सभासदांना मतदान. २) पार्से केंद्र - हे केंद्र पेडणे शेतकरी शाखा कार्यालयात असून त्या पार्से, आगरवाडा व तुये गावातील सभासदांना मतदान करता येईल.

३) मांद्रे केंद्रे हे शेतकरी शाखा कार्यालयात मांद्रे व मोरजी गावातील सभासदासाठी. ४) हरमल केंद्र - हे संस्था शाखेत असून कोरगाव, हरमल, पालये व केरी सभासदांसाठी. ५) तांबोसे केंद्र हे तंबोसे सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत असून उगवे तांबोसे, मोपा, पोरस्कडे, नयबाग, खाजने व अमेरे. ६) कासारवर्णे केंद्र हे संस्थेच्या शाखेत असून त्यात कासारवर्णे, वझरी, चांदेल, हाळी, इब्रामपूर, हळर्ण-तळर्ण व हणखणे. गेली सुमारे पस्तीस वर्षे मिलिंद केरकर यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने यशस्वीरीत्या वाटचाल केली. यंदा प्रथमच त्यांच्या शिवाय ही निवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या