रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाला निवडणूक आयोगान दिली मान्यता

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने गोव्याच्या निवडणूक रिंगणात औपचारिकपणे उडी मारली आहे
Revolutionary Govans

Revolutionary Govans

Dainik Gomantak

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजू लागले आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी तृणमुलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. या पाश्वभूमीवर गोवा निवडणूक आयोगाने (Election Commission) गोवा रिव्होल्युशनरी गोवन पक्षाला रजिस्टर करुन अधिकृत असे पक्षाचे फुटबॉल (Football) हे चिन्ह दिले आहे.

गोव्याच्या निवडणूक रिंगणात औपचारिकपणे उडी मारली आहे. आरजीचे संस्थापक मनोज परब यांनी राज्याच्या राजधानीतील आझाद मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली होती. पक्ष प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले.

<div class="paragraphs"><p>Revolutionary Govans</p></div>
Goa Election Update: ...यामुळे प्रभुदेसाई यांची मडगावातून माघार

RG ने सात महिन्यांपूर्वी पक्ष म्हणून नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु, अद्याप त्यांना मान्यता मिळालेली नव्हती. परब यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि सध्या तृणमूल काँग्रेससाठी (Trinamool Congress) लॉबिंग करणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याचे जाहीर केले. “गोवावासीय लाचार नाहीत, आम्ही क्रांतिकारी आहोत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही आमचा गोवा (goa) वाचवू. परराज्यांतील लोकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची वेळ गोवावासीयांवर आली आहे. आज दलाल आहेत जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे धाव घेत आहेत. त्यांच्याकडे तत्त्वे नाहीत, त्यांच्याकडे विचारधारा नाही,” परब म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com