Panchayat Election: निवडणूक आयोगाकडून पंचायत निवडणूकीसाठी लोगो, टि-शर्ट लॉन्च

Election commission launches logo
Election commission launches logo Dainik Gomantak

गोवा राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवणूकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लोगो आणि टि-शर्ट लॉन्च केला आहे. मतदानासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी टि-शर्ट आणि सोशल मिडिया या माध्यमाचा वापर केला जाणार आहे. गोव्यातील 186 पंचायतीसाठी येत्या 10 ऑगस्टला मतदान होत आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जाणार आहे.

गोवा राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यु, व्ही, रमणमुर्ती, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे यांच्या उपस्थित आज (शनिवारी) लोगो आणि टि-शर्टचे अनावरण पार पडले.

Election commission launches logo
Salcete: सासष्टीत पंचायतींपासून बहुतांश आमदार ‘अलिप्त’

पंचायत निवडणूकीची सर्व तयारी पार पडली असून, 10 ऑगस्टला मतदान होत आहे. निवडणूक प्रचारासाठी रात्री दहा पर्यंत मर्यादा आहे, निवडणूक होत असलेल्या पंचायत क्षेत्रात रात्री दहा नंतर मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून संवेदनशील मतदार संघात लक्ष ठेवले जाणार आहे.

T-Shirt Launch
T-Shirt Launch Dainik Gomantak

दरम्यान, गोव्यात राजकीय पक्षांनी पंचायत निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. पंचायतीची निवडणूक पक्षीय निवडणूक होत नसली तरी, प्रत्येक राजकीय पक्ष आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी राज्यात पंचायत निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. दहा ऑगस्ट रोजी 186 पंचायतीसाठी मतदान होणार असून, 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. तेव्हा पंचायत निवडणूकीत कोणाचं पारडं जड राहणार हे पाहणं म्हत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com