गोवा: 'टीका उत्सवावरून' निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला इशारा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

‘टिका उत्सव’ देशात तसेच राज्यामध्ये ११ ते १४ एप्रिल काळात राबविण्यात येणार होता मात्र आरोग्य खात्याने हा उत्सव आता २१ एप्रिलपर्यंत वाढविला आहे.

पणजी: राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘टिका उत्सव’चा राजकीय पक्षानी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आल्यास हा उत्सव स्थगित करण्याचा इशारा राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या प्रसिद्धपत्रकामध्ये दिला आहे. हा ‘टिका उत्सव’ देशात तसेच राज्यामध्ये ११ ते १४ एप्रिल काळात राबविण्यात येणार होता मात्र आरोग्य खात्याने हा उत्सव आता २१ एप्रिलपर्यंत वाढविला आहे. (Election Commission warns state government over 'Tika Utsav')

टिका उत्सवाच्या ठिकाणी राजकीय पक्षाशी संबंधित कसल्याच प्रकारची जाहिरातबाजी तसेच निवडणूक उमेदवारांनी त्या ठिकाणी जाऊन रुग्णांना मतांसाठी आकर्षित न करण्याच्या अटीवर या मुदतवाढीला परवानगी देण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आचारसंहितेवर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘टिका उत्सव’च्या ठिकाणी जाऊन तेथे कोणताही प्रचार किंवा राजकीय पक्षाचे नेते लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना मतांसाठी आकर्षित करत तर नाहीत याची खातरजमा करावी. जर तेथे आचारसंहितेचा भंग केला जात असल्यास त्याची माहिती त्वरित आयोगाला दिली जावी, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

गोवा: ''दामू नाईक याच्याकडून सरकारी कर्मचारी व फॉरवर्डच्या...

राज्यात सुरू असलेल्या या ‘टिका उत्सव’ला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद लाभत आहेत. या ठिकाणी जाऊन काही राजकीय नेते लोकांना लसीकरण करताना स्वतःचे छायाचित्र काढून त्याला प्रसिद्धी देऊन जाहिरातबाजी करत असल्याचे आरोप काँग्रेस पक्षाने केले होते व त्यासंदर्भातची तक्रारही दाखल केली होती.

संबंधित बातम्या