गोवा डेअरीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दिसून आली चुरशीची लढत
Goa Dairy ElectionDainik Gomantak

गोवा डेअरीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दिसून आली चुरशीची लढत

कुर्टी - फोंडा येथील सहकार भवनमध्ये हे मतदान झाले. निवडणूक अधिकारी राजू मगदूम व इतर अधिकारी तसेच कर्मचार्यांनी निवडणूक कामकाज हाताळले.

फोंडा : गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या आज (रविवारी ) झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत 167 पैकी 166 जणांनी मतदान केले. एकजण आजारी असल्याने मतदान करू शकला नाही अन्यथा शंभर टक्के मतदान झाले असते.

कुर्टी - फोंडा येथील सहकार भवनमध्ये हे मतदान झाले. निवडणूक अधिकारी राजू मगदूम व इतर अधिकारी तसेच कर्मचार्यांनी निवडणूक कामकाज हाताळले.

गोवा डेअरीच्या बारा संचालकांच्या निवडीसाठी एकूण अडतीस उमेदवारांसाठी हे मतदान झाले. तीन पॅनल या निवडणुकीत उतरले आहेत. त्यात माधव सहकारी व श्रीकांत नाईक यांचा प्रत्येकी एक तर राजेश फळदेसाई व विठोबा देसाई यांचा संयुक्त एक पॅनल मिळून तीन पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Goa Dairy Election
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष शिरोडकरचे पहिले मोठे यश

गोवा डेअरीची गेल्या 2017 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता पाच वर्षांनी ही निवडणूक झाली असून या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.

गोवा डेअरीचा मागचा कार्यकाळ हा प्रशासकाच्या नियुक्तीवर चालला त्यामुळे यावेळेला गोवा डेअरीवर आपले प्रतिनिधित्व असावे या उद्देशाने 43 जणांनी उमेदवारी दाखल केली होती पण पाच जणांचे उमेदवारी अर्ज फेटाळल्याने शेवटी अडतीस उमेदवार निवडणुकीत शिल्लक राहिले आहेत. या अडतीस उमेदवारांत छत्तीस जणांची तीन पॅनल्स तर दोन स्वतंत्र उमेदवारांचे भवितव्य उद्या सोमवारी ठरणार आहे.

या निवडणुकीत राज्यभरातील 173 दूध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष मतदार असून त्यातील सहा अध्यक्ष कायदेशीर कारणास्तव निवडणुकीत भाग घेऊ शकले नाहीत त्यामुळे १६७ मतदार पात्र ठरले त्यातील फक्त एक वगळता इतर सर्वांनी उत्साही मतदान केले.

निवडणूक झाली बरे झाले

गेल्या निवडणुकीनंतर गोवा डेअरीवर बहुतांश काळ प्रशासकाची सद्दी राहिली. मात्र आता संचालक निवडीमुळे गोवा डेअरीवर दूध उत्पादक प्रतिनिधी कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आवश्यक होती. राज्य सरकारचे सहकार्य घेतल्याशिवाय गोवा डेअरीचा उत्कर्ष अशक्य आहे त्यामुळे निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना याचा सुद्धा विचार करावा लागेल.

- माधव सहकारी ( उमेदवार )

प्रशासन सुधारायला हवे

गोवा डेअरीचे प्रशासन सुधारण्या बरोबरच शिस्तही तेवढीच महत्वाची आहे. आमचे पॅनल त्यादृष्टीने कार्यरत राहील.

- राजेश फळदेसाई ( उमेदवार )

सहकार क्षेत्रासाठी हा धडा

गोवा डेअरी बळकावण्या साठी काही जणांनी प्रयत्न चालवले आहेत. पण ही डेअरी सर्वसामान्य दूध उत्पादकांची आहे याचा विचार सहकार क्षेत्रात असलेल्या काही तथाकथित धुरीणांना करायला लावणारी ही निवडणूक असून माझी स्वतंत्र उमेदवारी ही या लोकांसाठी एक उदाहरण आहे. माझ्या कार्यकाळात गोवा डेअरी जाग्यावर आणण्याचे प्रयत्न झाले ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे

- दुर्गेश शिरोडकर ( उमेदवार )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com