उमेदवाराचे निधन झाल्याने नावेली मतदारसंघातील निवडणूक रद्द

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सासष्टी तालुक्यातील नऊपैकी आठ मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात असून दवर्ली व वेळ्ळी मतदारसंघात सर्वाधिक ६ उमेदवार आहेत.

मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सासष्टी तालुक्यातील नऊपैकी आठ मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात असून दवर्ली व वेळ्ळी मतदारसंघात सर्वाधिक ६ उमेदवार आहेत. नावेलीतील एका उमेदवाराचे निधन झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. 

जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य डॉम्निक गावकर, अॅंथनी (बाबुश) रॉड्रिग्ज, राशोलचे माजी सरपंच जोजफ वाझ, बाणावलीच्या माजी सरपंच रॉयला फर्नांडिस या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसतर्फे सासष्टीतील आठ मतदारसंघात आपतर्फे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीन व  भाजपतर्फे दोन उमेदवार रिंगणात आहेत. 

दवर्ली मतदारसंघातून उल्हास तुयेकर (भाजप), अब्दुल शेख (अपक्ष), फ्लोरियानो फर्नांडिस (अपक्ष), मुर्तुजा कुकनुर (काँग्रेस) प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) आणि सुकुर गोम्स (अपक्ष) हे सहा उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

रायमधून जोजफ वाझ (काँग्रेस), क्रूझ परेरा (अपक्ष), डॉमनिक गावकर (अपक्ष) आणि लियांड्रिना गोम्स (आप), नुवेमधून ब्रिझी बार्रेटो (अपक्ष), असुसियाना रॉड्रिग्ज (काँग्रेस) आणि मार्सेलीना कुलासो (आप), कोलवामधून सुझी फर्नांडिस (काँग्रेस), एश्र्वर्या फर्नांडिस (आप) आणि वानिया बाप्तिस्त (राष्ट्रवादी काँग्रेस), बाणावलीमधून मिनीन फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस), रॉयला फर्नांडिस (काँग्रेस) आणि हेझल फर्नांडिस (आप), वेळ्ळीमधून जोन्स सिल्वा (अपक्ष), ज्युलियो फर्नांडिस (काँग्रेस), अॅंथनी रॉड्रिग्ज (अपक्ष), राफेल कार्दोझ (अपक्ष), स्वप्निल झाटेकर (अपक्ष) आणि ताउमार्तुग रॉड्रिग्ज, गिरदोलीमधून रुदोल्फिना वाझ (आप), संजना वेळीप (भाजप) आणि सोनिया फर्नांडिस (काँग्रेस), कुडतरीतून मिशेल रिबेलो (काँग्रेस), ब्रिंडा सिल्वा (आप), सरिता फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि अॅन्ड्रीया फर्नांडिस (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

संबंधित बातम्या