‘बीपीएस क्लब’च्या नूतन समितीची निवड

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

 मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लबची २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कार्यकालासाठी नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली आहे. संतोष जॉर्ज यांची अध्यक्षपदी तर योगीराज दिगंबर कामत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

फातोर्डा :मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लबची २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कार्यकालासाठी नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली आहे. संतोष जॉर्ज यांची अध्यक्षपदी तर योगीराज दिगंबर कामत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे ः- अवधुत कारे (चेअरमन), मांगिरीश कुंदे (उप चेअरमन), संदीप वेर्लेकर (उपाध्यक्ष), अतुल नायक (सह सरचिटणीस), प्रसाद चिटणीस (खजिनदार), फ्रॅंकस्की दा कॉस्ता (सहखजिनदार), ज्युस्त डिकॉस्ता, शशांक शिरवईकर, सिद्धार्थ कार्वाल्हो (सर्व सदस्य).

मडगावच्या बीपीएस क्लबला ८० वर्षांची परंपरा आहे. या क्लबाची स्थापना १९४० साली झाली होती. बीपीएस म्हणजे बेर्नार्दो पिएदाद सिल्वा. सिल्वा हे एकमेव  गोमंतकीय ज्यांना पोर्तुगालने गवर्नर म्हणून १८३५ साली नियुक्त केले होते.  हा क्लब जसा क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याच प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा क्लबचे काम कौतुकास्पद होत आहे.

या क्लबच्या परिसरात घरगुती समारंभासाठी, व्यापारी प्रदर्शनांसाठी सुसज्ज अशी सभागृहे आहेत. शिवाय एक उत्तम रेस्टॉरंट आहे. यातून क्लबला वर्षाकाठी अंदाजे एक कोटी रुपयाचे उत्पन्न होत असते. त्यातून मुलांसाठी पार्क, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, जिम, कराटे, नृत्य यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. क्लब दरवर्षी अखिल गोवा राज्य स्तरावर बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करते. शिवाय प्रत्येक रविवारी पार्किन्सन रुग्णांसाठी मोफत तपासणी येथे केली जाते. या शिवाय वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात अशी माहिती जॉर्ज यांनी दिली. क्लबचे अंदाजे १३०० सदस्य आहेत. हे केवळ मडगावचेच नसून गोव्यातील इतर भागातीलही 
आहेत.

संबंधित बातम्या