Waste Problem: कचरा समस्या सोडविण्यासाठी समविचारींचे पॅनल निवडणुकीत

‘व्हिजन सांताक्रुझ’ संकल्पनेद्वारे निवडणूक लढविण्याचा निर्णय
problem of waste management
problem of waste managementDainik Gomantak

पणजी: गेली अनेक वर्षे सांताक्रुझ पंचायतीमधील कचरा समस्या सुटलेली नाही व लोकांसाठी आवश्‍यक असलेल्या साधनसुविधा उभारण्याबाबत पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हिजन सांताक्रुझ’ ही संकल्पना पुढे घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या उमेदवारांच्या पॅनलमधील ॲड. आंतोनिओ लोरेन्सो यांनी दिली.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. लोरेन्सो म्हणाले, की सांताक्रुझ पंचायतीच्या प्रत्येक प्रभागात कचरा, पाणी व विजेच्या समस्या आहेत. पंचायतीने गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात कोणत्याच साधनसुविधा उपलब्ध केल्या नाहीत. उच्च न्यायालयाने ‘एमआरएफ’ साधनसुविधा न उभारल्याने वारंवार फटकारले आहे, तसेच दंडही वसूल केला आहे. पंचायत मंडळाच्या अपयशामुळे ही दंडाची रक्कम लोकांच्या करामधून जमा केली जात आहे.

problem of waste management
Goa's soil for Sansad Bhavan: गोव्याची संस्कृती पोचवूया संसद भवनात

या पंचायतीमधील यापूर्वीच्या पंच सदस्यांनी अनेक घोटाळे केलेले आहेत, त्याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे. पंचायतीला सरकारने अनुदान देण्याची योजना काढूनही या पंचायतीला नवे पंचायत घर उभारता आले नाही. या पंचायत क्षेत्रात शेती करण्यास वाव आहे. त्यामुळे पडीक जमिनीचा वापर शेती उत्पन्न घेण्यासाठी पॅनल निवडून आल्यावर केला जाईल.

या पत्रकार परिषदेवेळी सांताक्रुझ पंचायत निवडणुकीसाठी समविचारी उमेदवारांमध्ये ॲड. आंतोनिओ फर्नांडिस (प्रभाग - 1), रामा आनंद नाईक ऊर्फ चंदन (प्रभाग - 2), डोमिंगो फर्नांडिस (प्रभाग -3), लुईझा फर्नांडिस (प्रभाग - 4), गॉडफ्रे डिकुन्हा (प्रभाग - 5), मंगेश गावस (प्रभाग - 6), आर्थुर डिसोझा (प्रभाग - 7), मायरन आरावजो (प्रभाग - 8), कायतान आरावजो (प्रभाग - 9) व पिएदाद लुईझा फोन्सेका (प्रभाग - 11) हे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com