Goa Football: गोवा फुटबॉल असोसिएशनची निवडणुक प्रक्रिया सुरू

बुधवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार
Goa Football Association
Goa Football Association Dainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) आगामी कार्यकारी समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आला, बुधवारपासून (ता. 21) उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

(Election process start of Goa Football Association)

Goa Football Association
New Cricket Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल, 01 ऑक्टोंबरपासून होणार नवे नियम लागू

जीएफए कार्यकारी समिती निवडणूक 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे माजी न्यायाधीश प्रमोद कामत यांची निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती झाली असून निवडणूक प्रक्रिया त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जीएफए प्रभारी अध्यक्ष अँथनी पांगो यांनी दिली.

जीएफए निवडणूक कार्यक्रम

जीएफए निवडणुकीसाठी 21 ते 29 सप्टेंबर या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी साडेबारा, दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेचार या कालावधीत, तर 30 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्जांची छाननी 30 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून होईल.

स्वीकारलेल्या आणि फेटाळलेल्या अर्जांची यादी 7 ऑक्टोबरपर्यंत संघटनेच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल. 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल आणि त्याचदिवशी उमेदवार व सक्रिय क्लबना पाठविली जाईल.

Goa Football Association
Goa म्हाऊस गावाला दसरोत्सवामुळे एक वेगळी ओळख!

क्लब प्रतिनिधीस मतदानाचा हक्क

जीएफए निवडणुकीत मतदानास पात्र सक्रिय क्लबच्या अध्यक्ष, सचिव किंवा पदाधिकारी यापैकी एकास मतदान करता येईल. उमेदवारी अर्ज आणि मतदानास पात्र सक्रिय क्लबची यादी जीएफएच्या पणजी कार्यालयात उपलब्ध आहे. संबंधित क्लबला व्यवस्थापक-कार्यकारी समितीच्या ठरावासह मतदान प्रतिनिधीची 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com