
मे महिन्यात साखळी पालिकेच्या विद्यमान मंडळाची मुदत संपत असून, पालिकेला आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रभाग फेररचनेचा मसुदाही प्रसिद्ध केला असून, सूचना आणि हरकती मागविण्यासाठी मसुदा खुला ठेवला आहे. सूचना आणि हरकती घेण्यासाठी 13 मार्चपर्यंत मुदत आहे.
यावेळी साखळी पालिकेचा एक प्रभाग कमी करताना प्रभाग संख्या 13 वरून 12 अशी केरली आहे. प्रत्येक प्रभागात साधारण समान मतांची विभागणी करण्यासाठी एक प्रभाग कमी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सावंत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या साखळी पालिकेवर विरोधी गटाचे वर्चस्व आहे. मे महिन्यात निवडणूक होणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याने विद्यमान नगरसेवकांसह काही इच्छुकांनी सध्या चाचपणी सुरू केली आहे.
सत्ताबदलाचे नाट्य
दोन वर्षांनंतर सत्ताधारी गटात फूट पडल्यानंतर सगलानी यांना नगराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. नंतर सत्तेची चावी भाजप पुरस्कृत गटाकडे गेली. दहा महिन्यांनंतर पालिकेत पुन्हा घडामोडी घडताना सत्तेची चावी सगलानी गटाकडे आली आणि एप्रिल 2021 मध्ये राया पार्सेकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.
पार्सेकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात राजेश सावळ यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. सध्या तेच नगराध्यक्षपदी असून, ज्योती ब्लेगन उपनराध्यक्ष आहेत.
विरोधी गटाचे वर्चस्व
मे 2018 साली झालेल्या साखळी पालिकेच्या निवडणुकीत धर्मेश सगलानी यांच्या नेतृत्वाखालील ‘टूगेदर फॉर साखळी’ पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण तेरापैकी या गटाचे दहा नगरसेवक निवडून आले. नंतर नगराध्यक्षपदी धर्मेश सगलानी आणि उपनगराध्यक्षपदी कुंदा माडकर यांची निवड झाली.
पोटनिवडणुकीतही सरशी
नगरसेवक दामोदर घाडी यांचे अकाली निधन झाल्यानंतर मार्च 2011 मध्ये प्रभाग नऊसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत ‘टूगेदर फॉर साखळी’ आणि भाजप पुरस्कृत गटाच्या मिळून दोन उमेदवारांत सरळ लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीत ‘टूगेदर फॉर साखळी’ गटाचे राजेंद्र आमशेकर अवघ्या 17 मतांनी निवडून आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.