Election Wind: अशोक वेळीप 'तृणमूल'मध्ये दाखल

वडोंगरी पंचायतीचे माजी सरपंच अशोक वेळीप यांनी सुष्मिता देव आणि ओम प्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला
Ashok Velip enters Trinamool Congress
Ashok Velip enters Trinamool CongressDainik Gomantak

Election Wind: येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय हलचालींना वेग आला आहे. गोव्याच्या राजकारणाने (Goa Politics) संपूर्ण देशाच्या राजकारणात आगळावेगळा असा विक्रम केला आहे. 5 वर्षात तब्बल 24 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. आणि निवडणूक तोंडावर असतानादेखील हे राजीनामा आणि पक्षांतराचे सत्र सुरूच आहे.

Ashok Velip enters Trinamool Congress
अरविंद केजरीवाल एकदिवसीय गोवा दौऱ्यावर

मागील काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी तृणमूलमध्ये (Trinamool Congress Goa) जाहीर प्रवेश केला आहे. यातच आज गावडोंगरी पंचायतीचे (Gaondongri Panchayat) माजी सरपंच अशोक वेळीप यांनीही आज टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. सुष्मिता देव (Sushmita Dev) आणि ओम प्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसात खूप जणांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजपला बरोबरीची टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com