Konkan Railway Police: कोकण रेल्वे पोलिसांकडून मडगाव स्थानकावर प्रवाशांची तपासणी

Konkan Railway Police: पोलिस रोख रकमेच्या हालचालींवर कडक नजर ठेऊन आहेत.
Konkan Railway Police
Konkan Railway PoliceDainik Gomantak

Konkan Railway Police: गोव्यासह 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गोव्यात येत्या 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात या निवडणुका पार पडणार असून 10 मार्चपासून मतमोजणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. याच धरतीवर गोव्यात सर्वच पक्षांतर्फे तयारीला वेग आला आहे. राजकीय नेते घरोघरी जाऊन आपला प्रचार (Election Campaign) करताना दिसत आहे. आणि यामुळेच गोव्यातील स्थानिक पोलिस प्रशासन (Goa Police) सतर्क होऊन तपासणी करत आहे. (Konkan Railway Police News Updates)

Konkan Railway Police
Pratap Singh Rane: ...अखेर प्रतापसिंग राणेंच्या प्रचाराला सुरुवात!

रेल्वे पोलिसांकडून स्थानकावर तपासणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक गुन्हे होण्याची शक्यता असते. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात सगळीकडे पोलिस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. पोलिस रोख रकमेच्या हालचालींवर कडक नजर ठेऊन आहेत. यासाठीच कोकण रेल्वे पोलिसांनी (Konkan Railway Police) अमरावती एक्स्प्रेस (हावडा ते वास्को) मधून मडगाव स्थानकावर आलेल्या प्रवाशांची तपासणी केली.

जागोजागी नाकाबंदी करत पोलिस प्रशासन सतर्क

राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून गोवा पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिस करत आहे. शिवाय अवैध मद्यसाठा बाळगणाऱ्यांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com