गोव्यात निवडणुका वेळेवरच होणार - सीएम प्रमोद सावंत 

 गोव्यात निवडणुका वेळेवरच होणार - सीएम प्रमोद सावंत 
sawant goa 1.jpg

गोवा : गोव्याच्या (Goa) विधानसभा निवडणुकीला (Assembly elections) अद्यापी आठ महिने शिल्लक असताना त्या मध्यावधी म्हणजे लवकर होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) प्रतिक्रिया देत विधानसभा निवडणुका वेळेवरच म्हणजे फेब्रुवारी 2022 ला होतील असं स्पष्ट केला आहे . (Elections will be held on time in Goa - CM Dr. Pramod Sawant)

गोवा विधानसभेची मुदत एप्रिल 2022 पर्यंत आहे. मात्र तत्पूर्वीच विधानसभा विसर्जित करून गोव्याच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने(Maharashtrawadi Gomantak Party) विद्यमान सरकारला कोविडच्या (Covid19) कारणास्तव निवडणुका न घेता अधिक मुदत द्यावी अशी मागणी केल्याने तर्कवितर्कांना वेग आला आहे.

यावर मुख्यमंत्र्यांनी आज प्रतिक्रिया देत विधानसभेच्या निवडणुका या निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. मात्र तत्पूर्वी विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताच हेतू नसल्याचे सांगत त्या वेळेवरच होतील, असं स्पष्ट केल आहे.

सध्या गोव्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून त्यांच्याकडे 27 आमदार आहेत. एका अपक्ष आमदारांनीही विद्यमान सरकारला पाठिंबा दिला आहे. गोवा विधानसभेत 40 सदस्यसंख्या असून बहुमतासाठी 21 आमदारांची आवश्यकता असते. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com