गोव्यात कशी केली जाते कचऱ्यापासून वीजनिर्मिती

म्हापसा शहरातही होणार कचऱ्यापासून वीजनिर्मिती
गोव्यात कशी केली जाते कचऱ्यापासून वीजनिर्मिती
Electric Power generationDainik Gomantak

म्हापसा: म्हापसा (Mapusa) पालिकेचा कुचेली येथील प्रतिदिन पाच टन क्षमेतचा बायोगॅस प्रकल्प पूर्णत्वास आला असून, कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Electric Power generation) करणारा हा प्रकल्प सध्या उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिदिन पाच टन कचऱ्याच्या (garbage) माध्यमातून वीजनिर्मिती करणारा हा गोव्यातील (Goa) विकेंद्रित स्वरूपाचा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती या नात्याने ‘जी-सुडा’चे माजी सल्लागार तथा आकय-म्हापसा येथील रहिवासी गौरव पोकळे यांच्यावर जबाबदारी दिली होती. ‘यिंबी’ या नावाने सरकारदरबारी अधिकृत नोंदणी असलेली म्हापसा शहरातील कंपनी ते चालवत असून कचरा व्यवस्थापनातील अधिमान्यता लाभलेली ती संस्था आहे. कोणतेही शुल्क न आकारता या बायो-गॅस संदर्भात त्यांनी म्हापसा पालिकेला विविध सूचनावजा शिफारसी केल्या होत्या.

Electric Power generation
गोव्यातील शेतकरी आता ‘ऑनलाईन’!

‘मिलहेम एनवायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ने या बायो-गॅस प्रकल्पाची उभारणी केली असून, येत्या पाच वर्षांत त्याच कंपनीमार्फत प्रकल्प हाताळला जाणार आहे. या उपक्रमाची कार्यवाही करण्यासाठी म्हापसा पालिकेने शहरातील मोठमोठ्या गृहनिर्माण संस्थांशी संपर्क साधलेला असून, त्यापैकी सहा संस्थांनी स्वत:च्या आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत स्वारस्य दाखवले आहे. म्हापसा पालिका पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत 150 केजी बायो-गॅस प्रकल्प उभारणार आहे. त्या अनुषंगाने स्वखर्चाने प्रकल्प चालवणे व त्यांची देखभाल करणे याबाबत गृहनिर्माण संस्थांनी म्हापसा पालिकेला संमती दिली आहे. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर कचऱ्याच्या संकलनासंदर्भात म्हणाल्या, म्हापसा पालिकेने ‘निवळ म्हापसा, नितळ म्हापसा’ ही मोहीम प्रत्यक्षात आणण्याच्या हेतूने विविध उपक्रमांचे नियोजनबद्ध संयोजन केले असून, त्यासंदर्भातील कृती आराखडाही तयार ठेवण्यात आला आहे.

म्हापसा पालिकेने सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात कुचेली येथे प्रकल्प उभारला आहे व त्याची जबाबदारी ‘करो सांभाव’ या एजन्सीवर सोपवण्यात आली आहे. त्या एजन्सीला कचऱ्याच्या पुन:प्रक्रियेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून निधी मिळत असतो. ती एजन्सी सुक्या कचऱ्याचे काम हाताळणार असून, गृहनिर्माण संस्थांमधील कचऱ्याचेही व्यवस्थापनही त्यांच्याकडूनच होणार आहे. ‘करो सांभाव’ने केलेल्या सूचनांनुसार त्या गृहसंस्थांनी कचऱ्याची विभागणी करून दिली तर संबंधित संस्थांना पुन:प्रक्रिया करता येण्याजोग्या कचऱ्याबाबत तसेच ‘ई-वेस्ट’ संदर्भात प्रोत्साहनपर आर्थिक मोबदलाही दिला जाईल.

Electric Power generation
गोवा निवडणूक यंत्रणा गतिमान: 5 जानेवारीला अंतिम मतदार याद्या जाहीर

म्हापसा पालिकेच्या बायो-गॅस प्रकल्पातील कचऱ्यापैकी काही ऐवजाची प्लास्टिक, ग्लास इत्यादी स्वरूपात विभागणी करून त्याची इतरत्र विक्री केली जाणार आहे, तर काही ऐवज सिमेंटच्या कारखान्यांत पाठवण्यात येईल. या किफायतशीर प्रकल्पामुळे म्हापसा शहराला विजेबाबतीत अंशत: प्रमाणात का होईना आत्मनिर्भर होणे शक्य आहे.

- गौरव पोकळे, कचरा व्यवस्थापन सल्लागार

प्रकल्पाची कार्यवाही दोन टप्प्यांत

म्हापसा शहरातील बायो-गॅस प्रकल्प दोन टप्प्यांत कार्यान्वित केला जाईल. पहिल्या टप्प्यात ‘कामत गार्डन’, ‘सत आधार फेज-2’ आणि कुचेली येथील हरिंदर सांडू कॉम्पलेक्स’ यांना, तर दुसऱ्या टप्प्यात ‘प्रुडेंशिअल पेराडाइज’, ‘सत आधार फेज-१’ आणि ‘गार्डेनिया इलाइट’ यांना प्रत्येकी ‘150 केजी’ क्षमतेचे प्रकल्प उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर अन्य गृहनिर्माण संस्थांना आवश्यकता भासल्यास स्वखर्चाने अशा प्रकल्पांची उभारणी करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.