सांगे येथील ‘तो’ वीज खांब अन्यत्र हलवण्याची मागणी

वीज खांबामुळे या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात
सांगे येथील ‘तो’ वीज खांब अन्यत्र हलवण्याची मागणी
electricity poll on roadDainik Gomantak

सांगे : सांगे बसस्थानकाच्या बाजूला मध्य ठिकाणी असलेला वीज खांब दुसऱ्या जागी हलवावा, अशी मागणी बसमालक करत आहेत. हा वीज खांब म्हणजे नेत्रावळी-वाडे-भाटी भागात जाणाऱ्या बसचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

यापूर्वीही अनेक वेळा हा वीज खांब काढावा म्हणून सांगेवासीयांनी मागणी केली होती. मात्र वीज अभियंत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. या वीज खांबामुळे या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. या वीज खांबाच्या बाजूलाच मामलेदार कार्यालय आहे. या कार्यालयात येणारे कर्मचारी या ठिकाणी नो पार्किंगचा फलक असूनदेखील तिथे आपली चारचाकी वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे बसचालकांना बस बसस्थानकाबाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते. संध्याकाळच्या वेळी नेत्रावळीला इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे; पण सोमवारी या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यामुळे इलेक्ट्रिक प्रवासी बसला सुमारे एक तास उशीर झाला.

electricity poll on road
क्रांतिदिनानिमित्ताने पणजीच्या आझाद मैदानावर पुष्पचक्र वाहून वाहिली आदरांजली

सांगे येथील मामलेदार इमारतीत अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयात येणारे नागरिक आपली चारचाकी वाहने उभी करत असतात. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून याठिकाणी पूर्वी कुडचडे वाहतूक पोलिस तैनात केले होते; पण कोरोना काळापासून ते गायब झाले आहेत. या ठिकाणी पुन्हा वाहतूक पोलिस तैनात करावेत व मध्यभागी असलेल्या वीज खांबाचे स्थलांतर करावे, अशी मागणी सांगेवासीय करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com