विजेच्या लंपडावामुळे फोंड्यात लोक हैराण

उन्हाळ्यामुळे ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्यासारखी स्थिती; वीजमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
Electricity Problem In Ponda
Electricity Problem In PondaDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

फोंड्यात एका बाजूला जीवाची लाहीलाही करणारा उन्हाळा दुसऱ्या बाजूला सातत्याने होणारा विेजेचा लपंडाव यामुळे सध्या फोंड्यातील लोकांची अवस्था ‘आगीतून उठून फुफाट्यात’ पडल्यासारखी झाली आहे. परवा अवकाळी पावसामुळे गेलेला विजेचा पुरवठा तब्बल तीन तासांनी परत आला. काही ठिकाणी रात्रभर हा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दुसरे दिवशी परत सकाळी वीजखंडित झाली. फोंडा शहरात ही परिस्थिती तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याचा विचार करण्यापलीकडची स्थिती दिसते आहे. त्यात परत वीज खात्यातील कर्मचारी तर कानावर हात ठेवून बसल्यासारखे असतात. कितीही तक्रारी केल्या तरी ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती दिसते आहे.

(Electricity Problem In Ponda)

Electricity Problem In Ponda
कळंगुट येथील बेकायदा बांधकाम सील करण्याचा खंडपीठाचा आदेश

आता जर ही परिस्थिती तर पावसाळ्यात काय होईल हे सांगणे तर्कापलीकडचे आहे. पावसाळ्यापूर्वीची वीज दुरुस्तीची कामेही अजून बऱ्याच ठिकाणी सुरू झालेली नाहीत. मात्र ही दुरुस्तीची कामे म्हणजे देखावा आहे की काय असे मागचा अनुभव पाहिल्यास दिसते आहे. ऐन पावसाळ्यात वीज खंडित होणे हा तर नित्याचा प्रकार झाला आहे. ‘नेमीच येतो मग पावसाळा’ ही उक्ती माहित असूनसुध्दा वीजखात्यातील कर्मचारी लापरवाहीने वागताना दिसतात. फोंड्यातील ग्रामीण भागात तर तीन-चार दिवस वीजपुरवठा खंडित होत असतो आणि हे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.

त्यात आणखी जास्त वीज दाबामुळे ग्राहकांचे उपकरणे कुचकामी होण्याचे प्रकारही घडताना दिसत आहेत. मंत्री बदलले पण वीजखात्याची ग्राहकांप्रती असलेली हेळसांड मात्र बदलेली दिसली नाही. आता अनुभवी सुदिन ढवळीकर यांनी वीजखात्याचा ताबा घेतल्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी या वीजखात्याच्या कार्यालयांना अचानक भेटी देऊन त्या कार्यालयात जो गलथानपणा सुरू आहे त्याला तिलांजली द्यावी अशी मागणी वर येत आहे.

Electricity Problem In Ponda
सोनसोडो कचरा विल्हेवाटीचे कंत्राटदाराने वेळापत्रक सादर करावे

फोंड्यात (Ponda) विजेचे मुख्य कार्यालय असूनसुध्दा इथे ‘गोंधळात गोंधळ’ असा प्रकार दिसून येतो. वास्तवीक वीजपुरवठा ही बाब अत्यावश्यक बाबीमध्ये मोडत असल्यामुळे अंखडीत वीजपुरवठा मिळणे हा ग्राहकांचा हक्क मानला जातो. पण या हक्कावर सध्या वरंवटा फिरवला जात असून ग्राहक मात्र पेचात पडल्यासारखे दिसताहेत. यामुळे आता नवनिर्वाचित वीजमंत्र्यानी या खात्याला मार्गावर आणण्याचे बघावे अशी मागणी लोकांकडून व्यक्त होत आहे. आता युनिटमागे पाच ते दहा पैशाची वाढ झाल्यामुळे आधीच या वीजखात्याच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकाना अधिकच फटका बसणार आहे.

एका बाजूला वाढीव दराचा भुर्दंड तर दुसऱ्या बाजूला परत परत खंडित होणारी वीज यामुळे या अत्यावश्यक बाबीची ससेहोलपट झाली असून लोक मात्र कात्रीत सापडले आहेत. आणि यावर उपाययोजना करणे हे फक्त वीजमंत्र्याच्या हातात असून ते आता कामचुकार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात व सध्या गलथान झालेल्या या खात्याला कसे वठणीवर आणतात याचे उत्तर या पावसाळ्यात मिळू शकेल हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com