Goa Board: अकरावीच्या प्रवेशासाठी करावी लागणार शिकस्त

Students.jpg
Students.jpg

पणजी: यंदा दहावीची परीक्षा रद्द झाली आणि निकाल अंतर्गत गुणांवर आधारित असल्याने यंदा निकालाचा टक्का वाढणार आहे. परीक्षेस बसलेल्या 24 हजार 700 विद्यार्थ्यांपैकी 24 हजार विद्यार्थी जरी उत्तीर्ण झाले, तरी अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी शिकस्त करावी लागणार आहे. अकरावीच्या 18 हजार 930 जागाच उपलब्ध असल्याने सरकारला एक तर तुकडी वाढवण्यासाठी परवानगी द्यावी लागेल, हायस्कूलना अकरावीचा वर्ग सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे. (Eleventh grade students in Goa will have to face difficulties for admission)

राज्यात कला शाखेच्या 4 हजार 973, वाणिज्य शाखेच्या 5 हजार 741, विज्ञान शाखेच्या 4 हजार 965 तर व्यावसायिक विद्याशाखेच्या 3 हजार 251 जागा आहेत. सर्वसाधारणपणे 3 हजार विद्यार्थी ते तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था याकडे वळतात. त्यामुळे 21 हजार विद्यार्थी जरी अकरावीच्या शिक्षणासाठी इच्छुक राहिले तरी शिक्षण खात्यासमोर विद्यार्थी प्रवेशाचा पेच उभा ठाकणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 हजाराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकूण 393 विद्यालये
राज्यात 393 माध्यमिक विद्यालये आहेत. सर्वच माध्यमिक विद्यालयांना जोडून उच्च माध्यमिक विद्यालये नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भटकंती करावी लागते. उदाहरण द्यायचे झाल्यास मांद्रे येथे एकच उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने मांद्रे, आगरवाडा, चोपडे, मोरजी परिसरातील विद्यार्थ्यांना शिवोली गाठावी लागते, तेथे प्रवेश न मिळाल्यास म्हापसा किंवा पेडण्याचा पर्याय त्यांना स्वीकारावा लागतो. काणकोणमध्ये चार उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. तेथे विद्यार्थी संख्या वाढल्यास त्यांना कुंकळ्ळी किंवा मडगावपर्यंत यावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com