जनसुनावणीत सहभागी होण्यासाठी जनतेला दिला ई-मेल आयडी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

जनसुनावणीत सहभागी होण्यासाठी जनतेला goapcb@gspcb.in या ईमेलवर  ४ ते १२ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी लागणार आहे. केवळ शंभर जणांनाच जनसुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.

पणजी : दाबोळी विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे विस्तारीकरण प्रकल्पाला पर्यावरण दाखला देण्यापूर्वीची जनसुनावणी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ घेणार आहे. सांकवाळ येथील समाज केंद्र, विमानतळ वसाहत येथे ही सुनावणी ४ डिसेंबरला सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. 

या जनसुनावणीत सहभागी होण्यासाठी जनतेला goapcb@gspcb.in या ईमेलवर  ४ ते १२ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी लागणार आहे. केवळ शंभर जणांनाच जनसुनावणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.

प्रकल्प परिसरातील रहिवाशांना यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांना आभासी पद्धतीने सहभागी व्हायचे आहे त्यांनी goapcb@gspcb.in या ईमेलवर ईमेल आयडी सादर करावी लागणार आहे. मुरगावात काही महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या जनसुनावणीला स्‍थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्‍यामुळे ४ डिसेंबर रोजीच्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या