Canacona : काणकोणात आपत्कालीन आसरा प्रकल्प पूर्णत्वाकडे

हे प्रकल्प केंद्र सरकारचे गृह खाते आणि जागतिक बँकेच्या अर्थ साह्याने उभारण्यात आले आहेत.
Emergency shelter project Canacona
Emergency shelter project CanaconaDainik Gomantak

Canacona News : चक्रीवादळ धोका उपशमन प्रकल्पांतर्गत काणकोणमध्ये उभारलेल्या तीन आपत्कालीन आसरा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हे प्रकल्प केंद्र सरकारचे गृह खाते आणि जागतिक बँकेच्या अर्थ साह्याने उभारण्यात आले आहेत. पैंगीण पंचायत क्षेत्रातील महालवाडा व पालिका क्षेत्रातील नगर्से येथे शासकीय प्राथमिक शाळा इमारती मोडून त्याजागी हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर चापोली येथे जलस्रोत खात्याच्या जमिनीत तिसरा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

महालवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेचे वर्ग गेली चार वर्षे भाड्याच्या खोलीत चालत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे वर्ग या इमारतीत भरविण्यात येणार आहेत. महालवाडा येथील प्रकल्प 5 एप्रिल 2018 ला सुरुवात झाली होती आणि 26 सप्टेंबर 2019 ला पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र प्रकल्प तीन वर्षे रेंगळला होता. काम सुरू झाले. त्यावेळी 2 कोटी 83 लाख 71 हजार 430 रूपये खर्च अपेक्षित होता.मंगळवारी काणकोणचे गटविकास अधिकारी अनिल नाईक, पंचायत सचिव राजीव नाईक गावकर, प्रशासक सर्वेश फडते, पंच सुनील पैंगणकर, जलस्त्रोत खात्याचे अभियंते व कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांनी प्रकल्पाची संयुक्तपणे पहाणी केली.

Emergency shelter project Canacona
Smriti Irani : ‘सिली सोल्स’ प्रकरणामध्ये स्मृती इराणींचा पाय खोलात

या प्रकल्पाला वीज व पाणी जोडणी घेण्यासाठी प्रकल्प पूर्णत्वास आल्याचा दाखला मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी ही पाहणी करण्यात आली. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी सरपंच, पंचायत सचिव जलस्रोत खात्याचे दोन प्रतिनिधी, पंच, अनुसूचित जाती -जमातीचा प्रतिनिधी, दुर्लक्षित वर्गातील प्रतिनिधी, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य अशा सोळा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com