माशेल सम्राटची आज स्थापना

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

सम्राट क्‍लबतर्फे माशेल येथे नवीन क्‍लब स्थापन करण्यात आला असून, उद्या शनिवारी (ता.३१) नूतन क्‍लबचे उद्‌घाटन आणि अधिकारग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

 डिचोली:  सम्राट क्‍लबतर्फे माशेल येथे नवीन क्‍लब स्थापन करण्यात आला असून, उद्या शनिवारी (ता.३१) नूतन क्‍लबचे उद्‌घाटन आणि अधिकारग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

दुपारी १२ वा. जुने-गोवे येथील ओल्ड गोवा रेसिडन्सी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उद्‌घाटन सोहळ्यास प्रमुख पाहूणे या नात्याने कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत.

काजल चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या  माशेल सम्राट क्‍लबचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे- जयराम परब (सचिव), गणेश बांदेकर (खजिनदार), हेमंत नाईक (भावी अध्यक्ष), सर्वेश फुलारी (उपाध्यक्ष), अखिलेश न्हावेलकर (कार्यक्रम प्रमुख), मनोजकुमार घाडी (क्‍लब विस्तार प्रमुख), रुद्राक्ष देसाईं (सभासद विस्तार प्रमुख), अनि  ता रायकर (जनसंपर्क प्रमुख) सिध्दी तारी (लेखा तपासनीस).आणि दिगंबर कोलवाळकर 
(सल्लागार).

संबंधित बातम्या