कुवेतमधील गोमंतकियांचा रोजगार धोक्यात

jobs
jobs

पणजी

कुवेत देशाने परदेशींची संख्या कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तेथे गेली कित्येक वर्षे कामाला असलेल्या गोमंतकियांची माहिती अनिवासी भारतीय (एनआरआय) आयोग कार्यालयाकडे नाही. या परदेशींच्या गोव्यातील विविध संघटनांशी संपर्क साधण्यात आला असून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. 
कुवेतमधील संसदेत परदेशी कामगारांची संख्या कमी करण्यासंबंधीच्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिल्याने त्याची कार्यवाही सुरू  झाल्यास कुवेतमध्ये असलेल्या गोमंतकियांचा रोजगार धोक्यात येणार आहे. यासंदर्भात मत व्यक्त करताना ॲड. सावईकर यांनी सांगितले की, कुवेत येथून मायदेशी जबरदस्तीने परत पाठविल्या जाणाऱ्या गोमंतकियांचे पुनर्वसन करण्यास आयोगाची तयारी आहे. 
कोविड - १९ मुळे जे गोमंकीय कुवेत येथे अडकून आहेत त्यांच्याशी संपर्क सुरू आहे व त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुवेतच्या या नव्या पद्धतीमुळे गोमंतकियांना रोजगार गमावून परतावे लागणार हे गोव्यासाठी नाविन्य आहे. विदेशातील नोकऱ्या सोडून परतावे लागणाऱ्या गोमंतकियांसाठी सरकारने पर्याय शोधण्याची गरज आहे. जेव्हा हे परदेशी कायमचे गोव्यात परततील तेव्हा सरकारला त्यांच्या भवितव्याबाबत विचार करायला हवा. एनआरआय आयोग व सरकार एकत्रित बसून या स्थलांतरांची कशी काय काळजी घेता येईल याबाबत ठोस रुपरेषा ठरविण्याची गरज पडणार आहे. सध्या आयोगाचे कुवेतच्या या हालचालींवर बारकाईन लक्ष ठेवले आहे, असे ॲड. सावईकर म्हणाले. 
कुवेतमध्ये रोजगारानिमित्त असलेल्या भारतीयांची संख्या सुमारे १५ लाखांच्या आसपास आहे. त्यातील अनेकजण हे कुवेत सरकारी कार्यालयात आहेत. या एकूण भारतीयांमध्ये गोमंतकियांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. गोव्यातील अनेक नोकरीनिमित्त कुवेतमध्ये आहेत. कुवेतमधील या गोमंतकियांवर येथील अनेकजण अवलंबून आहेत. त्यामुळे राज्यात आधीच बेरोजगारी वाढली असताना त्यात या कुवेतमधील गोमंतकियांची भर पडणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com