आगामी काळात पेडणेत रोजगार उपलब्ध होणार

 Employment opportunities due to various projects in Pernem
Employment opportunities due to various projects in Pernem

पेडणे: आगामी काळात पेडणे मतदारसंघात विमानतळ, आयुष इस्पितळ, स्टेडियम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान यासारखे अनेक प्रकल्प येणार असून त्यात अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पेडण्यात विकासाच्या कामासाठी मला साथ देण्यासाठी तोर्से व धारगळ दोन्ही जिल्हा पंचायत सदस्य निवडून येणे गरजेचे असल्याने भाजपच्या या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी धारगळ  येथे  बोलताना केले. धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील सरपंच, पंच, कार्यकर्ते, भाजप महिला मोर्चा, बूथ अध्यक्ष यांची सभा येथील ग्राम पंचायत  सभागृहात आयोजीत केली होती.


भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर धारगळ जिल्हा पंचायत उमेदवार मनोहर धारगळकर  तोर्से जिल्हा पंचायत भाजपच्या उमेदवार सीमा खडपे, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गवस, धारगळच्या सरपंच सुनीता राऊळ, विर्नोडाचे सरपंच मंगलदास किनळेकर, पोरस्कडेचे सरपंच ग्लेंसी परेरा, सुशांत मांद्रेकर, चांदेल हसापुरचे सरपंच संतोष मळिक, सुकाजी नाईक, माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, वासुदेव देशप्रभू, विश्वनाथ तिरोडकर, पंचायत सदस्य तथा माजी सरपंच भूषण नाईक उपस्थित होते.
मंत्री आजगावकर म्हणाले, विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे. उमेदवार मनोहर धारगळकर, पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गवस, उषा नागवेकर, भूषण नाईक, सुशांत मांद्रेकर, वासुदेव देशप्रभु यांनी विचार व्यक्त केले.


भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, भाजप पक्ष हा जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे. कोरोना महामारीच्या काळात देशभर भाजप नेते, कार्यकर्ते लोकामधे जाऊन काम करत होते तर बाकीचे सगळ्या पक्षानी पत्रके काढून पक्ष चालविला. सध्या धारगळमध्ये जे कोण नेते झाले आहेत, ते बाबू आजगावकर यांच्यामुळेच. बाबु आजगावकर यांच्या विकास कार्यपद्धतीवर पक्ष समाधानी आहे. त्यांचे मंत्रीपद वैगेरे काढून घेण्यात येईल. त्यांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत वगळण्यात येईल. या केवळ विरोधकांनी पसरविलेल्या अफवा आहेत. आजगावकर  यांच्या बरोबर जिल्हा पंचायतीच्या दोन्ही उमेदवारांना पक्षाने सम्मती दिली असून सर्व भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी काम करावे.
सूत्रसंचालन माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष पांडुरंग परब यांनी केले. संतोष मळिक  यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com