Goa Recruitment: ‘GHRDC’मध्ये रोजगाराच्या संधी!
Goa Recruitment in GHRDCDainik Gomantak

Goa Recruitment: ‘GHRDC’मध्ये रोजगाराच्या संधी!

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या (GHRDC) कर्मचाऱ्यांसाठी संधी

पणजी: राज्यातील (Goa) विविध खात्यांत रिक्त असलेल्या क व ड वर्गातील जागा भरण्यात येईपर्यंत गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या (GHRDC) कर्मचाऱ्यांचा वापर त्यासाठी करण्यात येईल. मल्टीटास्क सर्व्हिसेसमुळे महामंडळात आणखी काही पदे उत्पन्न होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Prmaod Sawant) यांनी दिली.

Goa Recruitment in GHRDC
Goa Vaccination: कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सुर्ला गाव 100 % लसवंत

या महामंडळाची बैठक आज सचिवालयात झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्‍यमंत्री म्हणाले, मल्टीटास्क सर्व्हिसेस (एमटीएस), कारकून व चालक पदाच्या सरकारी खात्यात रिक्त असलेल्या जागा तात्पुरत्या या महामंडळातील कर्मचाऱ्यांची वर्णी लावून भरण्यात येतील. अशा रिक्त होणाऱ्या जागा कायमस्वरूपी भरण्यात येईपर्यंत भविष्यात महामंडळातील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याने त्या कामासाठीची कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.