Goa Tourism: जेटी धोरण साकारण्यासाठी पर्यटन खाते सक्षम- रोहन खंवटे

वेन्झी व्हिएगस यांच्या प्रश्‍नाला विधानसभेत लेखी उत्तर
Rohan khaunte
Rohan khaunteDainik Gomantak

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पर्यटन धोरणावरून सरकारने ठाम भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धोरणावरून एनजीओ आणि विरोधी पक्षांनी जोरदार विरोध होऊन सरकारने माघार घेतलेली नाही. (Goa Tourism)

जलक्रीडा, पर्यटनाच्या उद्देशाने प्रवासी क्रूज जहाजे चालवणे, प्रवासी क्रूज जहाजांची नोंदणी, प्रवासी क्रूज जहाजांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्रांची अधिसूचना या सर्व व्यवस्थापन गोवा पर्यटन व्यापार कायद्याच्या अंतर्गत येते.

त्यामुळे पर्यटनाच्या उद्देशाने अशा जेटींचा वापर करण्याबाबत जेटी धोरण तयार करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असे लेखी उत्तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिले. आमदार वेन्झी व्हिएगस यांनी जेटी धोरणासंदर्भात तारांकित प्रश्‍न विचारला होता.

पर्यटन खाते गैर पर्यटन हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या बार्जेस, कोळसा वाहतुकीसाठी जेटी इत्यादी व्यवहार खात्याच्या अखत्यारित येत नाही.

कोळसा वाहतुकीसाठी केले सागरमाला कार्यक्रम या धोरणाला लागू होत नसून संबंध येण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे खंवटे यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. व्हिएगस यांनी कोळसा वाहतुकीसंदर्भात प्रश्‍नात उल्लेख केला होता.

Rohan khaunte
Mapusa Cylinder Blast : म्हापशातील बार-रेस्टॉरंटमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट

पर्यटन धोरणाच्या सद्यस्थितीबाबत व्हिएगस यांनी विचारलेल्या मुद्द्यावर खंवटे यांनी सांगितले की, धोरणासंदर्भात नागरिकांकडून सूचना आल्या असून त्यांची छाननी केली जात आहे.

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियम, कायदे, परवाना आणि मानके यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी अहवाल गोवा पर्यटन मंडळाच्या उच्चाधिकार समिती समोर मांडला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com