देशात खेळासाठी उत्साहवर्धक वातावरण, केंद्र सरकारचे प्रोत्साहन निर्णायक- मेहता

कमलेश मेहता म्हणाले, देशात आता खेळास पाठिंबा देण्यासाठी व्यवस्था तयार होत आहे.
Kamlesh Mehta
Kamlesh MehtaDainik Gomantak

देशात खेळासाठी उत्साहवर्धक वातावरण तयार होत असून विशेषतः केंद्र सरकारचे प्रोत्साहन निर्णायक ठरत असल्याचे मत भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू, आता भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव कमलेश मेहता यांनी शनिवारी व्यक्त केले.

गोव्यातील ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जागतिक टेबल टेनिस महासंघाच्या अध्यक्ष पेत्रा सॉर्लिंग, स्तुपा स्पोर्टस अॅनालिटिक्सच्या सीईओ मेघा गंभीर, भारताचा दिग्गज टेबल टेनिसपटू आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या खेळाडू मंडळाचा सदस्य अचंता शरथ कमल यांची उपस्थिती होती.

कमलेश मेहता म्हणाले, देशात आता खेळास पाठिंबा देण्यासाठी व्यवस्था तयार होत आहे. साधनसुविधा उंचावत आहेत. केंद्र सरकारकडून भरीव प्रोत्साहन मिळत आहे, विशेषतः पंतप्रधान खास लक्ष देत आहेत. खास वेळ काढून ते पदक विजेत्या क्रीडापटूंना भेटतात, त्यांची आपुलकीने विचारपूस करतात. हे चित्र खूप आश्वासक आहे. सरकारचा पाठिंबा देशातील क्रीडा जगतासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Kamlesh Mehta
शिगमोत्सवाची परेड पारंपरिक मार्गानेच, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अडचण होणार नाही! महापौरांचा विश्वास

टेबल टेनिस आराखडा बदलाची प्रक्रिया

देशातील टेबल टेनिस खेळाविषयी टिप्पणी करताना कमलेश मेहता म्हणाले, की आमच्या कार्यकारिणीने गेल्या डिसेंबरमध्ये ताबा घेतला. या खेळात खासगी भागीदारीसाठी कंपन्या पुढे येत आहेत. आम्ही देशातील स्पर्धांचा आरखाडा बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पॅरा-टेबल टेनिसलाही पाठिंबा दिला जात आहे. या खेळात देशाला पदके मिळत आहेत. देशात टेबल टेनिस खेळ बहरण्यासाठी दर्जेदार भारतीय टेबल टेनिस प्रशिक्षकांची गरज आहे. देशातील टेबल टेनिस गुणवत्ता लहान वयात शोधून त्यावर शास्त्रोक्त, तांत्रिकदृष्ट्या पैलू पाडणे आवश्यक आहे, मेहता म्हणाले.

Kamlesh Mehta
Kabaddi Tournament: आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एमईएस, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय विजेते

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी

भारतात डब्ल्यूटीटी स्पर्धा प्रथमच होत आहे. देशातील युवा टेबल टेनिसपटूंसाठी ही मोठी संधी आहे. भारतीय खेळाडूंची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी उठावदार ठरली, मनिका बत्राने आशिया कप स्पर्धेत ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकले.

डब्ल्यूटीटी स्पर्धेमुळे देशातील टेबल टेनिसपटूंना जगभरातील मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळण्याची सराव करण्याची, तशीच नवोदितांना या खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि शिकण्यास वाव मिळाला असल्याचे मतही कमलेश यांनी व्यक्त केले.

Kamlesh Mehta
Fire In Goa: गोव्यात आगीचे सत्र सुरूच- कुडचडे येथील भुसारी दुकानाला आग, पाच लाखांचे नुकसान

कोरियन जोडी मिश्र दुहेरीत विजेती

डब्ल्यूटीटी मिश्र दुहेरीत कोरियाच्या जँग हूजिन व जेऑन जिही जोडीने विजेतेपद मिळविले. शनिवारी संध्याकाळी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी जपानच्या मिवा हारिमोटो व शुनसुके टोगामी जोडीवर 3-1 (11-7, 11-8, 10-12, 11-7) असा विजय नोंदविला.

पराभवामुळे 14 वर्षीय हारिमोटो हिचे पहिल्या डब्ल्यूटीटी आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचे स्वप्न भंगले. तिने महिला दुहेरीतही मियू नागासाकी हिच्यासह अंतिम फेरी गाठली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com