Vasco : वास्कोत रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमण हटविले

इतर ठिकाणी दुपदरीकरणाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण
Railway Station
Railway Station Dainik Gomantak

येथील रेल्वे स्टेशन लगतच्या भागात रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी वास्को पोलिस निरीक्षक, वास्को रेल्वे पोलिस निरीक्षकद्वारे रेल्वे पोलिस फोर्स कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविली.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या होऊ घातलेल्या रेल्वे दुपदरीकरण मार्गाच्या कामाला वेग आला असून वेळसाव, कासावळी भाग वगळता इतर ठिकाणी दुपदरीकरणाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. वास्को स्टेशनजवळही रेल्वे दुपदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

Railway Station
Valpoi News : सत्तरीत आंघोळीसाठी बंधारे हाऊसफुल!

कब्रस्तानजवळ निर्माण झालेला अडथळा नुकताच पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी कब्रस्तान समिती, रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सोडवला.

शुक्रवारी पोलिसांच्या विविध पथकांनी रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविली. यावेळी पोलिसांच्या आवाहनानंतर स्थानिकांनी स्वत:हून त्यांनी केलेले अतिक्रमण हटविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com