Goa Agriculture: कृषी कार्यक्रमांचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न

8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान कृषी कार्यक्रम निर्मात्यांसाठी प्रभावी मूल्यांकन आणि क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
Agriculture
AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture: कृषी क्षेत्रातील प्रगत संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे. त्याआधारे कृषी उत्पन्न, उत्पादन आणि इतर पूरक व्यवसाय वाढीस लागावेत यासाठी आयसीएआर- केंद्रीय किनारी संशोधन संस्था ओल्ड गोवा येथे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान कृषी कार्यक्रम निर्मात्यांसाठी प्रभावी मूल्यांकन आणि क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आकाशवाणी आणि दूरदर्शनचे उपमहासंचालक सुनील भाटिया यांनी आज पत्रकार परिषदेत कार्यशाळेची माहिती दिली. ते म्हणाले, कृषी मंत्री रवी नाईक, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ वसुधा गुप्ता यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रमाचे उद्‍घाटन होईल.

कार्यशाळेत दक्षिण-पश्‍चिम विभागातील 35 विविध स्थानकांतील कार्यक्रम अधिकारी/निर्माते सहभागी होणार आहेत. 

Agriculture
Culture Award: राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण लवकरच...

कार्यशाळेदरम्यान कृषी विषयांवर व्याख्याने, किसान वाणी कार्यक्रमातील आव्हाने आणि किसान वाणी कार्यक्रमाची सद्यस्थिती यांचा समावेश आहे.

यावेळी आंतरराष्ट्रीय भरड धान्य- 2023, समाज माध्यमांची व्याप्ती वाढवणे आणि भारताची कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप इकोसिस्टम: संभाव्य आणि आव्हाने यावर उहापोह केला जाणार आहे.

Agriculture
Goa Politics: काँग्रेसचा ‘सेव्ह एसबीआय’चा नारा

शेतकऱ्यांचा गौरव

कार्यशाळेदरम्यान सहभागींना निरंकाल, फोंडा येथील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रत्यक्ष दाखवण्यात येणार आहेत. तसेच गोव्यातील प्रगतशील आणि पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यशाळेचे संचलन विजेंद्र सजवान, कार्यक्रम निर्माता, कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी, नवी दिल्ली यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com