गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद

गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद
Enjoy a special Goan meal on these Indigo flights during Goa Carnival

दाबोळी :  गोवा, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर  12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान गोवा कार्निव्हल साजरा केला जाणार आहे. 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान दाबोळी विमानतळावरून देशातील चार शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इंडिगो एअरलाईन्सकडून जेवणासाठी खास गोमंतकीय पदार्थांची मेजवानी दिली जाणार आहे. परंतु ही मेजवानी केवळ प्री-बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच असणार आहे.

इंडिगो एअरलाईन्स हे गोवा, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद या पाच विमानतळांवर  गोवा कार्निवल 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान गोवा कार्निव्हल साजरा करत आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून देशातील दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद या चार शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्री-बुकींग केलेल्या प्रवाशांना खास गोवन पद्धतीचे जेवण देण्यात येणार असल्याचं इंडिगो एअरलाईन्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

गोवा कार्निवलदरम्यान विमानतळावर स्थानिक गोयन नृत्य सादर केलं जाईल,त्याचबरोबर पारंपारिक गोयन कपडे परिधान करून विमानतळ कर्मचारीकाम करतील.फ्लाईट बोर्डिंगच्या घोषणा कोकणी आणि इंग्रजीमध्ये दिल्या जातील. गोवा कार्निव्हलदरम्यान विमानात दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये गोव्याच्या पारंपरिक व्हेज व नॉन-व्हेज पदार्थांचा समावेश असेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com