'गोव्याच्या विकासात उद्योजकांसह गोमन्तकचाही मोठा वाटा'

मुख्यमंत्री; ‘ब्रँ‍डस् ऑफ गोवा’चा दिमाखदार सोहळा
Gomantak program
Gomantak programDainik Gomantak

पणजी: गोव्‍याच्‍या प्रगतीत आणि विकासात उद्योजकांचा मोठा वाटा आहे. तसेच राज्यात लोकशाही रुजविण्यात दै. ‘गोमन्‍तक’चे मोलाचे योगदान आहे, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. मिरामार येथील हॉटेल सिदाद दी गोवा येथे झालेल्‍या ‘गोमन्‍तक’ आयोजित ‘ब्रँ‍डस् ऑफ गोवा’ या सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी गोव्‍याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक, मुख्य व्‍यवस्‍थापक सचिन पोवार, सकाळ माध्यम समूहाचे कॉर्पोरेट कम्‍युनिकेशनचे संपादक राजेंद्र हुंजे उपस्‍थित होते. ‘गोमन्तक’तर्फे आयोजित राज्‍याच्‍या विकासात आणि प्रगतीमध्ये योगदान दिलेल्‍या विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांचा यावेळी सत्‍कार करण्यात आला. आपल्‍या स्‍वागतपर भाषणात दै. ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक म्‍हणाले, 1961 मध्ये गोवा मुक्‍त झाला,

Gomantak program
IPL 2022: पृथ्वी शॉ पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार का?

तर 1963 मध्ये ‘गोमन्‍तक’ सुरू झाला. पहिले संपादक बा. द. सातोस्कर यांनी घालून दिलेला समाजकारणाचा पाया ‘गोमन्‍तक’ने आजही जपला आहे. येथील समुद्र किनारे, जंगले, वारसास्‍थळे आणि स्‍वच्‍छ निसर्गासाठी गोवा ओळखला जातो. राज्‍यात औद्योगिक विकास व्‍हायला हवा, पण येथील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण करंदीकर आणि सिद्धी उपाध्ये यांनी केले. सोहळ्याच्‍या सुरवातील प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर यांचा गीतगायनाचा कार्यक्रम झाला.

प्रदूषणविरहित उद्योगांना प्राधान्‍य: पर्यावरणपूरक उद्योगांमध्ये गोवा आज चौथ्या क्रमांकावर आहे. भविष्यात प्रथम क्रमांंकावर येईल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. राज्‍यात प्रदूषण करणारे उद्योग येणार नाहीत याची काळजी सरकार घेईल. तसेच राज्‍यात पोलाद उद्योगही आणले जाणार नाहीत. पर्यावरणाचा समतोल राखून प्रदूषणविरहित उद्योगांना प्राधान्‍य देण्यासाठी राज्‍य सरकार पुढाकार घेत असल्‍याचे ते म्‍हणाले.

नवीन उद्योगांचे स्‍वागत व्हायला हवे: आपले राज्‍य पर्यटनावर अवलंबून आहे. यासाठी कृषी, आरोग्‍य, आयआयटी, शिक्षण आदी क्षेत्रातील पर्यटनवाढीसाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. तसेच सर्वंकष आणि सातत्‍यपूर्ण विकासासाठी नवनवीन उद्योगांचे आणि प्रकल्‍पांचे स्‍वागत करायला हवे, पण काही प्रकल्‍पांना विरोध होतो. काही हरकत असेल तर विरोधकांनी प्रमारमाध्यमांपुढे जाण्यापूर्वी माझ्याकडे यावे. माझ्याशी चर्चा करावी. माझे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

Gomantak program
करिमाबादच्या विजयात तुनीषची तुफानी फटकेबाजी

दै. ‘गोमन्तक’ला शुभेच्छा

गोव्‍याच्‍या सामाजिक क्षेत्रात ‘गोमन्‍तक’चे मोठे योगदान आहे. बा. द. सातोस्‍कर, माधव गडकरी, नारायण आठवले यांच्‍यासारखे दिग्गज आणि आता राजू नायक यांच्‍या रूपाने ‘गोमन्‍तक’ला सामाजिक बांधिलकी जपणारे संपादक-संचालक लाभले आहेत. लोकशिक्षणाची ही परंपरा ‘गोमन्‍तक’ने यापुढेही चालू ठेवावी, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दै. ‘गोमन्‍तक’ला शुभेच्‍छा दिल्‍या.

दोनापावला: ‘ब्रॅंडस्‌ ऑफ गोवा’ कार्यक्रमात सत्कारमूर्तींसमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, लक्ष्मीकांत पार्सेकर, रवी नाईक, प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, संपादक-संचालक राजू नायक व मान्यवर

31 उद्योजकांचा सत्‍कार सोहळा

‘गोमन्‍तक’च्‍या या सोहळ्यात जिनो फर्मास्‍युटिकल्स‍चे दिलीप साळगावकर, बांदोडकर सन्‍सचे समीर काकोडकर, तालक डेव्‍हलपर्सचे राजेंद्र तालक, कायनाको ग्रुपचे शेखर सरदेसाई, हॉटेल मारुतीचे निखिल सावंत, नेस्‍ले, नॉबर्ट फिटनेसचे नॉबर्ट डिसोझा, आर. जी. हॉस्‍पिटलचे डॉ. अंजूम महाबरी, ई. पी. बायोकॉम्पोझिटचे राजकुमार कामत, श्री मल्लिकार्जुन आणि चेतन माणू देसाई कॉलेज, विठ्ठल ज्‍वेलर्सचे मिलिंद शिरोडकर, डॉ. पृथ्वीराज आमोणकर, अभिगणेश इन्‍वेस्‍टमेंटचे अभिजीत सावंत, बाबू फार्माचे दत्ताराम मोपकर, मुष्टिफंड आर्यनचे व्‍यंकटेश प्रभुदेसाई, पराडकर फर्निचरचे लक्ष्मण पराडकर, कोहिनूर ऑप्‍टीशियनचे आदेश कारवारकर, राज हौसिंगचे संदीप निगळ्ये, कुकूज टॉयचे राईल नाईक, मोन्‍टाना कन्फेकन्‍शनर्सचे सुरेश फडते, नास्‍नोडकर ज्‍वेलर्सचे सुरेश नास्‍नोडकर, गोवा इस्‍पातचे संजीव मथियान, एजिलचे सेहर शिरोडकर आणि स्‍वाहम कळंगुटकर, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे लक्ष्मीकांत पार्सेकर, आदित्‍य वडापाव सेंटरच्‍या कविता सावंत, एएसजी आय हॉस्‍पिटलचे डॉ. सीन डिसिल्वा, दुर्गा मोटर्सचे अशोक सप्रा, प्राची ॲक्‍वा मिनरलचे किरण सिरसाट, प्रसाद सिरसाट, वेलनेस फॉरएव्‍हरचे अश्रफ बिरन, रियल ग्रुप आणि कॅम इंडस्‍ट्रिजचे डॉ. कायतान फर्नांडिस यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com