IFFI Goa: इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागासाठी प्रवेशिका घेण्यास सुरूवात

Goa IFFI News Updates
Goa IFFI News Updates Dainik Gomantak

53 वा आंतरराष्ट्रिय फिल्म फेस्टिवल, गोवा (इफ्फी) (53 rd International Film Festival, Goa 2022) येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. इफ्फीत इंडियन पॅनोरमा (Indian Panorama) विभाग 2022 साठी प्रवेशिका घेण्यास सुरूवात झाली आहे. 18 ऑगस्टपर्यंत फेस्टिवलसाठी अर्ज पाठविता येणार आहेत.

Goa IFFI News Updates
Greater Panaji PDA: ग्रेटर पणजी पीडीए रद्द ; नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती 

या विभागात सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक फिल्मला इंग्रजी सबटाईटल्स असणे बंधनकारक आहे. ज्या फिल्मसाठी प्रवेशिका सादर केली जाणार आहे, ती फिल्म मागील बारा महिन्यात चित्रित किंवा सीबीएफसी प्रमाणपत्र (Central Board of film certification) मिळालेली असावी. म्हणजेच 01 ऑगस्ट 2021 ते 31 जुलै 2022 या दरम्यानचा कालावधी. सीबीएफसी प्रमाणपत्र न मिळालेल्या फिल्मस देखील सादर केल्या जाऊ शकतात.

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने प्रविशिका सादर करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट आहे. ऑनलाईन अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुभा 25 ऑगस्ट पर्यंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com