Goa Session Court : वेळसाव रेल्वे दुहेरी मार्गाने पर्यावरण धोक्यात; खंडपीठाची केंद्रासह रेल विकास निगमला नोटीस

पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने पंचायतीने रेल विकास निगम लिमिटेडला नाल्यात मातीचा भराव घालण्याचे काम बंद ठेवण्याचे निर्देश
Goa Session Court
Goa Session CourtGomantak Digital Team

Panaji Session Court : रेल्वेच्या दुहेरी मार्गासाठी वेळसाव येथे पुलाचे काम तेथील नाल्यात माती टाकून करण्यात येत आहे. त्याविरोधात गोंयचो रापणकारांचो एकवट आणि गोंयचो एकवट या संघटनांनी खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे. आज सोमवारी प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने केंद्रीय रेल्वे मंत्रालय व रेल विकास निगम लिमिटेडला नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 26 जूनला ठेवली आहे.

राज्यात रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. वेळसाव गावातून जाणाऱ्या या मार्गासाठी तेथील नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. या पुलासाठी तेथील नाल्यामध्ये मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका पोहचत आहे. त्यामुळे तेथील नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची दिशाच बदलली गेली आहे.

Goa Session Court
Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

सीरआरझेडच्या नियमांचे उल्लंघन

रेल्वे कायद्याच्या कलम ११ नुसार रेल्वेच्या कामासाठी कोणत्याही विभागाकडून परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही, हे उच्च न्यायालयानेच एका याचिकेत नमूद केलेले आहे. मात्र, पर्यावरणाला धोका असल्यास त्यासाठी परवानगी घेण्याची तरतूद गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेण्याची सक्ती आहे. पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने पंचायतीने रेल विकास निगम लिमिटेडला नाल्यात मातीचा भराव घालण्याचे काम बंद ठेवण्याचे निर्देश दिले तरी हा आदेश त्यांना लागत नसल्याने काम सुरूच ठेवले आहे.

Goa Session Court
Goa Petrol-Diesel Price: टाकी फुल्ल करण्याआधी जाणून घ्या इंधनाचे दर; वाचा आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

याचिकादारांनी नोंदविलेले आक्षेप

  • रेल्वेच्या दुहेरी मार्गाच्या कामासाठी नाल्यात सखल भागात मातीचा भराव टाकण्यात आल्याने उत्तरेकडून वाहणारे रेतीच्या पोत्या लावून अडविण्यात आले. हे पाणी वळसा घेऊन पुढे जात असल्याने सीआरझेडचे उल्लंघन झाले आहे.

  • अतिरिक्त पुलाचे सुरू असलेले काम सीआरझेडच्या ५०० मीटर अंतरात येत असल्याने या नाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नाल्याचे पाणी अडविल्याने तेथील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांच्या उदारनिर्वाहावर गदा आली आहे.

  • त्यामुळे न्यायालयाने प्रतिवाद्यांना तेथील नाल्यात टाकलेला मातीचा भराव काढण्यास लावून पर्यावरण जपण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com