पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी फुलवला शेतमळा

संजय घुग्रेटकर
रविवार, 9 ऑगस्ट 2020

नेमके हेच सूत्र धरून खांडोळा - माशेल येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी आपल्या बागायतीत भाजीची लागवड केली आहे. स्वतः मशागत करीत असल्याने लागवडही उत्तमरीत्या झाली असून या नैसर्गिकरीत्या मशागत केलेल्या भाजीची पाहणी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली व मधू गावकर यांचे कौतुक केले.

फोंडा

एका बाजूला कोरोनाची महामारी, दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनमुळे सगळ्याच व्यवहारांवर आलेली आफत यामुळे दर्जेदार खाण जेवण मिळणेच मुश्‍किलीचे ठरले आहे. साध्या भाजीपाल्यासाठी आपल्याला कर्नाटकावर विसंबून रहावे लागत आहे. विशेष म्हणजे रासायनिक प्रक्रिया केलेला अशा प्रकारचा भाजीपाला जीवनासाठी मारक ठरत आहे. मात्र आता गोमंतकीयही स्वकष्टाने लावलेली आणि फुलवलेली भाजी खाताना दिसतात. विशेष म्हणजे नैसर्गिकरीत्या पिकवलेली ही भाजी आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेच, त्याचबरोबर स्वतः कष्ट करून पिकवलेली भाजी रोजच्या जेवणात उपलब्ध झाली तर कोण समाधान...!
नेमके हेच सूत्र धरून खांडोळा - माशेल येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी आपल्या बागायतीत भाजीची लागवड केली आहे. स्वतः मशागत करीत असल्याने लागवडही उत्तमरीत्या झाली असून या नैसर्गिकरीत्या मशागत केलेल्या भाजीची पाहणी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली व मधू गावकर यांचे कौतुक केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे झाडांचे रोपण करण्याबरोबरच त्यांची काळजी घेऊन त्यांची वाढ योग्यरीत्या होते की नाही, हे पाहणेही प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत सुदिन ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केले. विशेष म्हणजे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आपल्या मडकई मतदारसंघात गेल्याच महिन्यात झाडांचे वाटप करताना खास करून विविध शाळा विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांनाही ही झाडे भेट दिली होती. ज्यामुळे झाडांचे महत्त्व प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना पटवून द्यावे, असा त्यामागचा हेतू होता.
दरम्यान, पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी आपल्या बागायतीत लावलेल्या भाजी व इतर झाडांच्या लागवडीसंबंधी सुदिन ढवळीकर यांना माहिती दिली. निसर्गाला पूरक आणि पर्यावरणाला उपयुक्त अशी ही लागवड असून गोव्यातील जैववैविध्य सांभाळणे हे प्रत्येक गोमंतकीयाच्या हाती असून जागा उपलब्ध असेल भाजी व फळांच्या झाडांची लागवड करा, अशा लागवडीतून नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळे आणि भाजीपाला हा आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे मतही मधू गावकर यांनी व्यक्त केले.

Editing _ SANJAY GHUGRETKAR

संबंधित बातम्या