टाळेबंदीत नोकरी गमावलेल्‍यांना ‘ईएसआय’कडून तीन महिन्‍यांचा अर्धा पगार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकरीच्या आणि रोजगारीवर टाच आली आहे. त्यामुळे बेरोजगार भत्ता म्हणून केंद्र सरकारने तीन महिन्यांचा अर्धा पगार देण्याचे जाहीर केले. त्यानुसार २४ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ज्यांची नोकरी गेली आहे, असे कर्मचारी या योजनेचे लाभार्थी असतील.

पणजी: टाळेबंदीच्या काळात नोकरी गेलेले, पण राज्य विमा महामंडळाचे (ईएसआय) सदस्य राहिलेल्यांना केंद्र सरकारच्या निर्णयाने तीन महिन्यांचा अर्धा पगार मिळणार आहे. कामगार व रोजगार खात्याकडून ‘ईएसआय’कडे तशी यादी मागितली असली, तरी अद्याप ती यादी ‘ईएसआय’कडून सादर झाली नसल्याची माहिती हाती आली आहे.

टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकरीच्या आणि रोजगारीवर टाच आली आहे. त्यामुळे बेरोजगार भत्ता म्हणून केंद्र सरकारने तीन महिन्यांचा अर्धा पगार देण्याचे जाहीर केले. त्यानुसार २४ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ज्यांची नोकरी गेली आहे, असे कर्मचारी या योजनेचे लाभार्थी असतील. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार २१ हजार रुपये होता आणि तो कर्मचारी ‘इएसआय’कडे नोंदीत असावा. त्यासाठी ‘इएसआय’कडून त्या कर्मचाऱ्याची पूर्णतः खातरजमा झाल्यानंतरच ती यादी कामगार आयुक्तांकडे जाणार आहे. 

खातरजमा झाल्‍यावर होणार प्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ईएसआय’कडे नोंदीत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन लाखांवर आहे. त्यातून नोकरी गेलेल्यांची खातरजमा करण्यास ‘इएसआय’ला  विलंब होत राहिल्यास बेरोजगारांना मिळणारी रक्कम ही विलंबाने मिळेल, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे ‘इएसआय’कडून कामगार खात्याकडे नोकरी गेलेल्यांची यादी आली नाही. तरीही अनेक कर्मचारी कामगार आयुक्तालयाकडे सतत फोनवरून विचारणा करीत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या