मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ इथेनॉलवाहू टँकरची कंटेनरला धडक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

शनिवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या  धारगळ-पेडणे इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला एका इथेनॉलवाहू टँकरने धडक दिली. सुदैवाने  कंटेनरमध्ये कोणी नसल्याने जिवितहानी टळली.

धारगळ-पेडणे : शनिवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या  धारगळ-पेडणे इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला एका इथेनॉलवाहू टँकरने धडक दिली. सुदैवाने  कंटेनरमध्ये कोणी नसल्याने जिवितहानी टळली.

धडक बसलेला कंटेनरला हा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. अचानक एका नियंत्रण सुटलेल्या टँकरने मागून येऊन कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक दिलेला टँकर हा साताऱ्याहून वास्कोला इथेनॉल वाहून नेत होता. जोरदार धडकीमुळे कंटेनर उलटून पडला, तर टँकरमधील इथेनॉलची गळती सुरू झाली. आजूबाजूच्या ग्रामस्थांकडून उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांनी क्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर उलटलेल्या कंटेनरला बाहेर काढण्यात आलं. यानंतर पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत इथेनॉल वायू गळती थांबवली. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसून, टॅंकर चालक रशिद खान जखमी झाला आहे.  

 

संबंधित बातम्या