Margao: ‘तीन महिने झाले तरी कचऱ्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाईना!’

तीन महिने झाले तरी कचऱ्याच्या नमुन्यांची तपासणी होत नाही- सावियो कुतिन्हो
Margao
MargaoDainik Gomantak

मडगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूला सोनसोडो येथील कचरा आणून टाकलेला व त्यावर मातीचे थर घातले होते. त्याला शॅडो कौन्सिलने आक्षेप घेतला होता. 24 नोव्हेंबर रोजी कौन्सिलने कचऱ्याचे तीन नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतर 7 डिसेंबर 2022 रोजी प्रदूषण मंडळाने कचऱ्याचे नमुने स्वत: घेऊन ते तपासणीस पाठविले व तपासणीनंतर या कचऱ्यामध्ये मर्कुरीसारखे घातक द्रव्य असल्याचे आढळले.

त्यानंतर कौन्सिलने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविलेल्या नमुन्यांचे काय झाले, अशी विचारणा केली असता १२ जानेवारी त्यांचे उत्तर आले की या नमुन्यांची अजून तपासणीच झालेली नाही. तीन महिने झाले तरी कचऱ्याच्या नमुन्यांची तपासणी होत नाही, तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाला काय म्हणावे, असा प्रश्र्न पडतो, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Margao
Crime: फोंडा तालुक्यात सर्वाधिक चोऱ्यांच्या घटना

पोल्युशन कंट्रोल की क्रिएटिंग मंडळ?

कचऱ्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ किती गंभीर आहे याची या प्रकरणातून प्रचीती येते, असेही कुतिन्हो यांनी सांगितले. या मंडळाला पोल्युशन कंट्रोल की पोल्युशन क्रिएटिंग मंडळ म्हणावे, असेही त्यांनी उपहासाने म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com