मासळी बाजार खुला झाला तरी फोंड्यात रस्त्याकडेला मासेविक्री

fish
fish

फोंडा: फोंड्यातील (Ponda) मासळी मार्केट (Fish Market) खुले झाले तरी अजूनही बरेचजण रस्त्याच्या कडेला बसून मासेविक्री करीत आहेत. मागच्या काळात सरकारने कर्फ्यू  (Curfew) लागू करून मासळी मार्केट बंद केले होते. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली होती, मात्र त्याचा गैरफायदा घेत मासे विक्रेत्यांनी जागा मिळेल तेथे बसून मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती.  (Even though the fish market is open fish is being sold along the road in Fonda)

आता कोरोनाचे संक्रमण बऱ्याच अंशी कमी झाल्याने सरकारी आदेशानुसार मासळी बाजार खुला झाला आहे. गेल्या सोमवारपासून मासळी बाजार खुला झाल्याने बरेच मासे विक्रेत्यांनी मासळी बाजारात बसणे पसंत केले. मात्र काही मासे विक्रेते अजूनही फोंडा शहरातील तसेच कुर्टी भागातील मुख्य रस्त्यांवर बसून मासे विक्री करीत आहेत. या प्रकारामुळे सगळीकडे माशांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून दुर्गंधी पसरलेली आहे.
Covid-19 Delta Plus Variant: गोव्यात तिसऱ्या लाटेची भीती; सरकारचे दुर्लक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com