रक्तदाते सुदेश नार्वेकर यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा

Dainik gomantak
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्तदानामुळे आपण दुसऱ्यांचे आयुष्य वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी पुढे यायला हवे. रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही आणि याचे महत्त्व जाणल्यामुळेच रक्तदाते सुदेश नार्वेकर यांनी या शिबिरात रक्तदान केलेले आहे. त्यामुळे रक्तदाते सुदेश नार्वेकर यांचा आदर्श सर्वांनी घेऊन रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. एम. रघुनंदन यांनी केले.

फोंडा

वैश्‍य गुरु सेवासमिती गोवातर्फे वैश्‍य गुरुसेवा समिती, फोंडा व गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळीच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात डॉ. रघुनंदन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महादेव खानोलकर, सुमीत वेरेकर, डॉ. संजय कोरगावकर, नगरसेविका जया सावंत, मनोज केणी, शिवानंद सावंत, मनोज गावकर, रूद्रेश पुजारी, प्रमोद सावंत, संजीव सावंत, मनोहर तिळवे, सुदेश नार्वेकर व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
फोंड्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे पाऊणशे रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. रक्तदाते नार्वेकर यांनी आतापर्यंतचे आपले ९१वे रक्तदान केल्यामुळे त्यांचे शिबिराच्या ठिकाणी कौतुक करण्यात आले. 
फोंड्यातील नक्‍टेश्‍वर सभागृहात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदानासाठी बांबोळी रक्तपेढीचे डॉक्‍टर व सहकाऱ्यांनी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या