अद्यावत ईव्हीएम मशीन गोव्यात दाखल

26 ऑक्टोबर रोजी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण सावंत (Narayan Sawant) यांनी दिली आहे.
अद्यावत ईव्हीएम मशीन गोव्यात दाखल
Additional Returning Officer Narayan SawantDainik Gomantak

गोवा विधानसभेच्या निवडणुका (Goa Assembly Elections 2022) च्या जानेवारी महिन्यामध्ये होतील असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला असून यासाठी गोव्यात एम 3 ही आधुनिक ईव्हीएम (EVM) मशीन गोव्यात आली आहेत. त्यांची 26 ऑक्टोबर रोजी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून ती राजकीय पक्षांसाठी आणि सामान्य माणसांना पाहण्यासाठी खुले असतील अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण सावंत (Narayan Sawant) यांनी दिली आहे.

Additional Returning Officer Narayan Sawant
गोवा विधानसभा निवडणुकीतून काँग्रेसमुक्त भारताचा प्रारंभ

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्री कुणाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, गोवा फॉरवर्ड (Goa Forward), राष्ट्रवादी काँग्रेस आणि मगो पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान याद्यांमध्ये नव्याने नाव दाखल करण्यासाठी किंवा नावे रद्द करण्यासाठी 1 नोव्हेंबर पासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तर 20- 21 नोव्हेंबर रोजी आणि 27- 28 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुथ वर निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर 5 जानेवारी 2022 ला अंतिम मतदान याद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोग कार्यालयाने दिली आहे.

Related Stories

No stories found.