गोव्यात निवडणुकांच्या कामांना वेग

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी इव्हीएम मशीनं पाठवण्याच्या कामाला सुरुवात.
EVM machines
EVM machinesTwitter

येत्या फेब्रुवारी महिन्यात देशातील पाच रांज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा (Goa Election 2022) या पाचही रांज्यांमध्ये निवडणुकांच्या कामाला वेग आला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी इव्हीएम (EVM) मशीन पाठवण्याच्या कामाला सुरुवात गोव्यात आजपासून सुरवात झाली आहे.

EVM machines
अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

कोविड नियमांचे पालन करून गोव्यात विधासभेच्या 40 जागांसाठी 14 तारखेला मतदान होणार आहे. निवडणुकीची तयारी म्हणून वास्कोत (Vasco) मामलेदार कार्यालयात प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ईव्हीएम मशीन (EVM) एक डिसेंबरलाच आणण्यात आली आहे.मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील जनतेसाठी सदर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याची प्रात्यक्षिके दाखविली गेली आहे. त्यासाठी एकूण 16 ईव्हीएम मशीन गोव्यात आणण्यात आली आहे.

EVM machines
उत्पल पर्रीकर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी काय?

गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून गोवा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी निर्वाचन अधिकारी उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग आप आपल्या कामाला लागले आहेत.तसेच त्यासाठीची निवडणुक यंत्रणांची सारवासारव चालू आहे. सरकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने नागरिकांच्या इतर कामावर थोडाफार परिणाम होत आहे. गोवेकरांच्या माहितीसाठी मतदार यादी www.ceogoa.nic.in या वेबसायटवर उपलब्ध आहे. या संकेत स्थळावर जावून उमेदवाार आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घेवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com