म्हापसा सम्राट क्लबतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

म्हापसा सम्राट क्लबतर्फे क्लबच्या ‘देश प्रथम सप्ताह’ या उपक्रमाचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. दीपक तिळवे यांच्या हस्ते माजी सैनिक प्रमोद विष्णू पळ यांचा सत्कार करण्यात आला.

म्हापसा: म्हापसा सम्राट क्लबतर्फे क्लबच्या ‘देश प्रथम सप्ताह’ या उपक्रमाचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. दीपक तिळवे यांच्या हस्ते माजी सैनिक प्रमोद विष्णू पळ यांचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम खोर्ली येथील सारस्वत महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. क्लबतर्फे त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पाटकर, क्लबचे अध्यक्ष संदीप वालावलकर, सचिव जयेश च्युरी यांची उपस्थिती होती.

यावेळी ॲड. तिळवे मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, राष्ट्रभक्ती वृद्धिंगत होण्यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून, त्या माध्यमातून देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल; तसेच, त्या माध्यमातून देशाप्रति आदरभाव व्यक्त करण्याची तसेच आपल्या देशाच्या शूर सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्राप्त होत असते. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होत असते, असेही ॲड. तिळवे यांनी सांगितले.

सम्राट क्लब ऑफ म्हापसाचे अध्यक्ष संदीप वालावलकर यांनी स्वागत केले. क्लबतर्फे हा सप्ताह वर्ष २०१८ पासून दरवर्षी साजरा केला जातो. त्या वेळी ॲड. तिळवे हे क्लबच्या अध्यक्षपदी होते व त्यांच्याच सूचनेनुसार हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. सचिव जयेश च्युरी यांनी आभार मानले.

goa

संबंधित बातम्या