Exam Warriors: साखळीमध्ये ''एक्झाम वॉरीयर्स चित्रकला स्पर्धा'' उत्साहात

आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविले. तर भविष्यात बेकारीच्या समस्येवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
Exam Warriors |
Exam Warriors |

Exam Warriors: विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविले. तर भविष्यात बेकारीच्या समस्येवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

''परीक्षा पे चर्चा'' उपक्रमांतर्गत ''परीक्षा वॉरीयर्स'' चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. पालकांनीही आपल्या पाल्यांवर दडपण न आणता त्यांना आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

साखळी येथील रवींद्र भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक खास अतिथी म्हणून उपस्थित होते. अन्य मान्यवरात भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिक्षण खात्याचे संचालक श्री. झिंगाडे, सहायक संचालक मनोज सावईकर, गोविंद पर्वतकर, गोरख मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर आदींचा समावेश होता.

Exam Warriors |
Konkani Language: रोहन खंवटे म्हणाले, कोकणी टिकवण्यासाठी 'या' गोष्टी करा

'मंत्र'' उपयुक्त ठरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला ''परीक्षा पे चर्चा'' हा उपक्रम दडपणाखाली परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक ठरत आहे. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान श्री. मोदी यांचे ''परीक्षा वॉरीयर्स'' हे पुस्तक विद्यार्थ्यांची नैतिकता वाढविण्यासाठी आणि परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. या पुस्तकात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाचे मंत्र असून, ते मंत्र प्रत्येकाने आत्मसात करावे. असे आवाहन केले.

''परीक्षा वॉरियर्स'' पुस्तकामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांवरील दडपण नाहीसे होण्यास नक्कीच मदत होणार. असे श्रीपाद नाईक म्हणाले. सदानंद शेट तानावडे यांनीही आपले विचार मांडले.

Exam Warriors |
National Sports: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे क्रीडा पर्यटनाला वाव -डॉ. प्रमोद सावंत

स्पर्धेला अफाट प्रतिसाद

गोवा शिक्षण विकास महामंडळ आणि माहिती व प्रसिद्धी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण खात्यातर्फे उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत बार्देशच्या सेंट थॉमस हायस्कूलचा विद्यार्थी डेनरीक शॉन डिसोझा विजेता ठरला. मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com