गोवा: खात्याअंतर्गत डीवायएसपी होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

20 वर्षानंतर राज्य सरकारने पोलिस उपाधीक्षकच्या (Dysp) पुष्टीकरणासाठी प्रशिक्षण व परीक्षा घेण्याचे ठरविले आहे.

20 वर्षानंतर राज्य सरकारने पोलिस उपाधीक्षकच्या (Dysp) पुष्टीकरणासाठी प्रशिक्षण व परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. अगोदर ज्यांची नेमणूक थेट किंवा पदोन्नतीद्वारे केली जात होती. तीन प्रयत्नात जर डीवायएसपी परीक्षेत अपयशी ठरला तर तो गोवा सरकारच्या अधिसूचित नियमांनुसार पीआय पदावर परत येईल. गोवा पोलिस सेवेतील कनिष्ठ  अधिकारी म्हणून निवडलेल्या आणि नेमणूक केलेल्या प्रत्येक उमेदवाराला सरकारने ठरविल्यानुसार पोलिस अकादमी किंवा प्रशिक्षण महाविद्यालयात 12 महिन्यांच्या प्रशिक्षणात भाग घेणे बंधनकारक आहे. हे प्रशिक्षण पोलिस अकादमी किंवा प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार असेल असे अप्पर सचिव माया पेडणेकर म्हणाल्या. (The examination will have to be given to become a DYSP under the department)

Goa Municipal Election 2021: मडगाव पालिकेवर कामत - सरदेसाईंच्या युतीचा झेंडा

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डीवायएसपी गोवा लोक प्रशासन व ग्रामीण विकास संस्था (GIPRD) येथे 45 दिवसांच्या विभागीय प्रशिक्षणात भाग घेईल. नियुक्तीच्या तारखेपासून 1 महिने पूर्ण होण्यापूर्वी जीआयपीआरडीमार्फत घेण्यात आलेल्या विभागीय परीक्षेला डीवायएसपीला यावे लागेल. ज्यांनी ही परीक्षा दिली नाही त्यांना तीन महिन्यांत पुन्हा या परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. जे लोक परीक्षा पास होणार नाहीत त्यांना परत नियुक्तीच्या 23 महिन्यापूर्वी परीक्षा देता येईल असे पुढे पेडणेकर म्हणाल्या. 

पुढे पेडणेकर म्हणाल्या “तीन वेळा प्रयत्न करूनही परीक्षा पास होण्यास अपयशी ठरलेल्या प्रोबेशनर डीवायएसपींना परीक्षा पास न झाल्यामुळे त्यांची सेवा संपूष्टात येईल''. अलीकडेच, डीपीएसपी पदावरून पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदोन्नतीसाठी काही विशिष्ट आवश्यकतांची सूट मिळावी यासाठी सरकारचा प्रस्ताव जीपीएससीने फेटाळला होता.

संबंधित बातम्या