Silly Souls Restaurant च्या मालकाला दिलासा; अबकारी आयुक्तांचा महत्वाचा निर्णय

मद्यविक्री परवाना तसेच पत्नीच्या नावे हस्तांतरण, नुतनीकरण वैध असल्याचा निर्वाळा
Silly Souls Restaurant Smriti Irani
Silly Souls Restaurant Smriti Irani Dainik Gomantak

Silly Souls Restaurant: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांकडून कथितरित्या चालविल्या जाणाऱ्या आसगाव येथील ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’ या रेस्टॉरंटच्या मालकाला दिलासा मिळाला आहे. अबकारी आयुक्तांनी या रेस्टॉरंटचा मद्यविक्रीचा परवाना योग्य आणि वैध असल्याचे म्हटले आहे.

Silly Souls Restaurant Smriti Irani
Goa Monsoon: राज्यात पुन्हा पावसाची शक्यता!

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता आणि वकील अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तक्रार दाखल केली होती. रेस्टॉरंटमधील लायसन्सचे नुतनीकरण आणि पत्नीच्या नावे हस्तांतरण योग्य असल्याचे अबकारी आयुक्तांनी त्यांच्या निर्णयात म्हटले आहे.

दागामा यांच्या परवान्यावरच रेस्टॉरंट चालवले जात होते, पण तो परवाना अवैध होता, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला होता. अँथनी दागामा यांचा मृत्यू झाल्यानंतर मद्यविक्री परवान्याचे जेव्हा चुकीच्या पद्धतीने नुतनीकरण केले गेले, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर अबकारी आयुक्तांनी त्यांच्या निर्णयात, हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दागामा यांच्या मृत्युनंतर परवान्याचे त्यांच्या पत्नीच्या नावे हस्तांतरण आणि त्यानंतर नुतनीकरण हे योग्य आणि वैध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Silly Souls Restaurant Smriti Irani
Goa Government: 'LED' वापराविरोधी कारवाईसाठी 56 कर्मचाऱ्यांची नेमणूक

सिली सोल्स कॅफे ॲण्ड बारचे मालक ॲन्थनी डि गामा यांनी हे रेस्टॉरंट 1 जानेवारी 2021 पासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी 50 हजार रुपये मासिक भाड्याने ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस' यांना चालवायला दिले होते. त्यासंदर्भातील कागदोपत्री व्यवहारही झाला होता. सिली सोल्स कॅफे ॲण्ड बारसाठी वापरलेला जीएसटी क्रमांक ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस’चा असून अन्न व औषध प्रशासनाकडून घेतलेला परवानाही त्यांच्याच नावावर आहे.

डि गामा यांनी 5 जानेवारी 2021 रोजी अबकारी खात्याकडे मद्य परवान्यासाठी अर्ज केला, तेव्हा सिली सोल्स हे ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस’कडे होते व त्यांची उग्रया मर्कंटाईल प्रा.लि.सोबत भागीदारी असून तिचे संचालक झुबिन इराणी हे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती आहेत, हे रॉड्रिग्स यांनी याआधीच्या युक्तिवादात सांगितले होते.

दरम्यान, यापुर्वी रॉड्रिग्ज यांनी या प्रकरणाला कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अबकारी खात्याने घाईघाईने कायद्यात दुरुस्ती केल्याचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com